Breaking News

नागपुरात समृद्धी महामार्गावर द्राक्षाचा ट्रक उलटला

Advertisements

बंगलोर येथून द्राक्षे भरून नागपूरला येणारा ट्रक समृद्धी महामार्गावर बुधवारी सकाळी उलटला. या आठवड्यात समृद्धी प्रवेश व्दारावर घडलेला हा तिसरा अपघात आहे. या घटनेत ट्रक चालक अभिजीत मंडल जखमी झाला.बंगलोर येथून द्राक्षे भरून ट्रक क्र डब्ल्यू बी ६७ सी १३४४ ने समृद्धी महामार्गाने नागपूरला येत असताना अनियंत्रित होऊन उलटला. ट्रकमधील द्राक्षाचे बॉक्स रस्त्यावर पडले होते.

Advertisements

पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जखमी चालक अभिजितला तात्काळ एम्स रुग्णालयात हलविण्यात आले.हिंगणा पोलिसांनी अपघाताची नोंद केली. समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटवर पथदिवे मागील 15 दिवसांपासून बंद असल्याचे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी सांगितले. त्यामुळे हे बंद पथदिवे ताबडतोब सुरु करण्याची मागणी होत आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 पटना। …

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नासिक। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *