Breaking News

शेतीवर अतिक्रमण : नकाशे होणार अद्ययावत

भारतीय सर्वेक्षण विभागातर्फे तब्बल 30 वर्षांनंतर महाराष्ट्रात ‘टोपोशीट’ बसविण्याचे काम खासगी कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात तब्बल 556 टोपोशीट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे नव्याने नकाशे तयार करण्यासाठी या टोपोशीटचा वापर होणार आहे. यासह राज्यात कोरस बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक रोअर बेस स्टेशनच्या परिघातील अक्षांश व रेखांश टाकल्यास जागेचा महसूल नकाशा मिळतो. या दोन्ही सुविधांमुळे राज्यातील शहर, जिल्हे, गावांचे नकाशे अद्ययावत होणार आहेत. भारतीय सर्वेक्षण विभागाचे संचालक कर्नल सुनील फत्तेपूर यांनी ही माहिती दिली.

राज्यात गेल्या 30 वर्षांत अनेक प्रकारची बांधकामे, प्रकल्प, रस्ते, धरणे बांधण्यात आली आहेत. राज्यातील 40 ड्रोनद्वारे तब्बल 38 हजार गावठाणांचे नकाशे पूर्ण झाले आहेत. यासह गावठाणाच्या नकाशासह भारतीय सर्वेक्षण विभागातर्फे राज्यातील 70 किलोमीटरच्या परिघात 77 कोरस रोअर बेस स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे.

रोअर बेस स्टेशनवरून ॠडचड द्वारे 70 किलोमीटरच्या परिघातील कोणत्याही ठिकाणाचा महसूल मोजणी नकाशा तयार होतो. बेस स्टेशनला टॅब जोडल्यास हा नकाशा तयार होतो. तर ‘टोपोशीट’मुळे राज्यातील विविध शहरांचे, तालुक्यांचे, गावांचे अद्ययावत नकाशे तयार होणार आहेत. या नकाशांचा वापर स्थानिक विकास आराखडा तयार करण्यासाठी होऊ शकतो. यामध्ये आरक्षित जागा, उद्याने, वने, जैवविविधता ठिकाणे, पाणवठे, वने इत्यादींसाठी जागा राखीव ठेवता येणार आहेत.

टोपोशीट म्हणजे काय?

एक सिमेंट काँक्रिटसारखा पाच ते सहा फुटाचा खांब असतो. तो जमिनीत रोवलेला असतो, त्यावरून जमिनीचे रेखांश व अक्षांश घेऊन उंची, समुद्र सपाटीपासूनचे अंतर मोजले जाते. त्यामुळे नकाशांवर रेल्वे, रस्ते मार्ग, धरण बांधणे शक्य होते.

About विश्व भारत

Check Also

बदल्यांसाठी किती पैसे दिले? मंत्री काय म्हणाले?

राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये बदल्यांसाठी गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे सर्वत्र खळबळ …

तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या ‘पीडब्लूडी’ अधिकाऱ्याला अटक

लग्नाचे आमिष दाखवत ३० वर्षीय तरुणीचे मागील ७ वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील(पीडब्लूडी)अधिकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *