Breaking News

आजपासून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा

नागपूर विभागात 16 ते 19 मार्चपर्यंत वादळी वारा, गारपीटीसह अतिवृष्टीची शक्यता आहे. 16 व 17 मार्च रोजी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्‍ह्यांत अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य आणि वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

भारतीय हवामान विभागातर्फे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयांत गुरुवारी व शुक्रवारी अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. त्यासोबतच 19 मार्चपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हयात शुक्रवारी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे‍ शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागात कच्ची तसेच टीनाच्या पत्र्याच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता असून, जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे. या काळात वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. यासोबतच दूरध्वनी लाईन व पायाभूत सुविधांची हानी होऊ शकते. वित्त व जिवीतहानी टाळण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

About विश्व भारत

Check Also

प्रेयसीचा खून करून नागपुरजवळील रामटेकच्या जंगलात पुरला मृतदेह

लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह नागपूरजवळील जंगलात पुरला. ही घटना मंगळवारी …

BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मुलाच्या कारची पाच वाहनांना धडक : नागपुरात खळबळ

महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या मालकीच्या ऑडी कारने शहरात मध्यरात्री हैदोस घातला. दुचाकी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *