Breaking News

डीएड अभ्यासक्रम बंद : शिक्षक कसे होणार? वाचा

जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने डीएडचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आता डीएड बंद होणार आहे. आता शिक्षक होण्यासाठी आगामी काळात 4 वर्षांची बीएडचीच पदवी घ्यावी लागणार आहे. नव्या शिक्षण धोरणांनुसार याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.केंद्र सरकारने डीएड बंद करण्याचे ठरविल्यानंतर आता राज्य सरकारनेही याबाबत निर्णय घेतला आहे.

आता जिल्हा परिषद शाळा आणि इतर शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी इयत्ता बारावीनंतर चार वर्षांची बीएड पदवी घेणं अनिवार्य राहणार आहे. विशेष म्हणजे बीएडच्या शिक्षणातही स्पेशलायजेशन असणार आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीस सुरुवात केलीय. त्यानंतरही राज्यात आता नव्या शैक्षणिक धोरणांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे.

नव्या शैक्षणिक धोरणांनुसार, आता बीएड बंद होणार आहे. तसेच पीजी केलेल्या विद्यार्थ्यांना एका वर्षात डीएड करता येणार आहे. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी बीएडचं शिक्षण असेल. तर बारावीनंतर ही डीग्री मिळवण्यासाठी चार वर्षांचं शिक्षण घ्यावं लागेल. विशेष म्हणजे कोणत्या विषयाचं शिक्षक व्हायचे,यावरुन विषय निवड असेल.

About विश्व भारत

Check Also

महाराष्ट्रासाठी एक्झिट पोलचा अंदाज?

महाराष्ट्रासाठी पोल डायरीचा एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो आहे? महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संपली आहे. आता …

नागपुरात ईव्हीएम बंद : मतदारांची दमछाक

मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरात दोन मतदान केंद्रात काही ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *