Breaking News

तुळजाभवानी मंदिरात ड्रेसकोड? तहसीलदारांकडून जाहीर प्रगटण

Advertisements

तुळजाभवानी मंदिरामध्ये विशिष्ट प्रकारचे कपडे घालून येणाऱ्यावर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला होता. मात्र अल्पवधीतच मंदिर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतलाय.तसेच यासंदर्भात तहसीलदार यांनी जाहीर प्रगटण काढले आहे.

Advertisements

मंदिरामध्ये वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही. तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला होता. मंदिर परिसरामध्ये याबाबतचे फलकही लावले होते.

Advertisements

मात्र आता तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत, असे मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे.

तुळजाभवानी मंदिर परिसरात ‘अंग प्रदर्शन, असभ्य आणि अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक लावण्यात आले होते. या फलकावर ‘कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भाव ठेवा, अशा प्रकारची विनंतीही करण्यात आली होती.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

गीता के अनुसार संसार सागर मे ज्ञानी ही सर्वश्रेष्ठ

गीता के अनुसार संसार सागर मे ज्ञानी ही सर्वश्रेष्ठ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   श्रीमदभगवत गीता …

दुुर्भावनाओं के आवेश में गंधी राजनीति की वजह से हिंदू धर्म बदनाम

दुुर्भावनाओं के आवेश में गंधी राजनीति की वजह से हिंदू धर्म बदनाम टेकचंद्र शास्त्री: 9822550220 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *