Breaking News

शेतकऱ्यांचा छळ! तलाठी नको : नागपुरात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे वक्तव्य

भारत राष्ट्र समितीचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव नुकतेच नागपुरात येऊन गेले. तलाठी या पदाविषयी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबलेल्या योजनांची माहिती देताना राव यांनी शेतकऱ्यांशी संबंधित असलेले सर्वात महत्त्वाचे तलाठी हे पद संपुष्टात आणल्याचे स्पष्ट केले.यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच झाला व महाराष्ट्रात सत्ता आल्यास हे मॉडेल राबवू, असे संकेतही दिले. दुसरीकडे तलाठ्यांकडून शेतकऱ्यांचा छळ सुरू असूनही शासनाने हजारो तलाठ्यांची पदे भरण्याची तयारी सुरू केली आहे

शेतकऱ्यांच्या शेतीशी संबंधित नोंदी ठेवण्यासाठी इंग्रज काळापासून जिल्हा प्रशासनात तलाठी पद आहे. मात्र,साधा सातबारा हवा असेल तर तलाठ्याला पैसे द्यावे लागते. हीच स्थिती इतर राज्यांतही आहे. पण राव यांनी तेलंगणात हे पद संपुष्टात आणून शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन केली. मात्र महाराष्ट्रात तलाठी पद संपुष्टात आणण्याऐवजी नव्याने पद भरती केली जात आहे.

लवकरच भरती

तलाठी संवर्गातील ४ हजार ४०३ रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने मान्यता दिली. अपर जमाबंदी यांची राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती. राज्यामध्ये ५१८ व्याने निर्माण केलेल्या एकूण ३ हजार ११० तलाठी साझे व ५ मंडळ अधिकारी कार्यालयांसाठी एकूण ३ हजार ६२८ पदे निर्माण करण्यात येणार आहे.

About विश्व भारत

Check Also

बम ब्लास्ट की धमकी के बीच गणेश विसर्जन को लेकर पुरे महाराष्ट्रसह मुंबई में अलर्ट

बम ब्लास्ट की धमकी के बीच गणेश विसर्जन को लेकर महाराष्ट्रसह मुंबई में अलर्ट टेकचंद्र …

PM मोदी को गाली देने वाला मामला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का बड़ा बयान

PM मोदी को गाली देने वाले मामले पर एकनाथ शिंदे का बड़ा बयान टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *