Breaking News

मुख्यमंत्री शिंदे नागपुरात आले आणि अर्ध्या तासात मुंबईला रवाना : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री गडकरींनी केले स्वागत

Advertisements

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी सायंकाळी नागपुरात आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर विमानतळावर वायुसेनेच्या विमानाने आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आदींनी त्यांचे स्वागत केले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरातून तातडीने मुंबईला रवाना झाले. आज नागपूर येथे शिंदे मुक्कामी असणार होते.

Advertisements

यावेळी एअर मार्शल विभास पांडे, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे , जिल्हाधिकारी विपिन इटनकर पोलीस अधीक्षक विशाल आनंद उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या बुधवार ५ जुलै रोजी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे.

Advertisements

उद्या गोंडवाना विद्यापीठात जाणार

4 जुलैच्या नागपुरातील मुक्कामानंतर राष्ट्रपती 5 जुलैला सकाळी गडचिरोलीकडे प्रयाण करतील. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच अडपल्ली कॅम्पस येथील प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला समारंभाला त्या उपस्थित राहिल. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती नागपुरात परतणार आहेत. त्याच दिवशी दुपारी कोराडीतील महालक्ष्मी देवीचे दर्शन व आरतीमध्ये त्या सहभागी होतील. त्यानंतर कोराडी मंदिर परिसरातील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.

कोराडी येथे भारतीय विद्या भवनतर्फे रामायण सांस्कृतिक केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या रामायण सांस्कृतिक केंद्रात पहिल्या दालनात चित्र स्वरूपात रामायणाची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या दालनात 185 ते 1947 या काळातील स्वातंत्र्यवीरांची शौर्यगाथा सचित्र मांडण्यात आली आहे. तीन एकर जागेवर दक्षिण भारतीय शैलीत हे सेंटर तयार करण्यात आले आहे.

राजभवनात आदिवासी बांधवांशी संवाद

दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महाकाव्य रामायणातील प्रसंग विविध चित्रांच्या स्वरूपात मांडलेले आहेत. चित्रांमधील घटना आणि व्यक्तिमत्त्वे समजून घेण्यासाठी येथे हिंदी, इंग्रजी आणि मराठीत माहिती देण्यात आली आहे. आतील सजावट ही राजवाड्यासारखीच असून, रंगसंगती, ध्वनी व्यवस्था आणि प्रकाश योजना त्याच पद्धतीने करण्यात आली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर, भारतीय स्वातंत्र्यातील क्रांतिकारकांच्या योगदानावर आधारित चित्र गॅलरी तयार करण्यात आली आहे. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी आहे. 6 जुलै रोजी सकाळी राष्ट्रपती आदिवासी समाज बांधवांशी राजभवन येथे संवाद साधतील. त्यानंतर मुंबईकडे प्रस्थान करतील.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *