Breaking News

IAS सुनील केंद्रेकर यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : केंद्रेकरांची ईडी चौकशी सुरु

Advertisements

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी तत्कालीन औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील 10 लाख शेतकऱ्यांचे एक सर्वेक्षण केले होते.

Advertisements

ज्यात एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार सुरु आहे, असा अहवाल सरकारकडे देण्यात आला. दरम्यान खळबळजनक अहवालाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताना पाहायला मिळाले. तर यावरून आता राजकीय प्रतिकिया देखील येत आहे. या अहवालावरच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. हा अहवाल जर खोटा ठरल्यास केंद्रेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे शिरसाट म्हणाले आहे.

Advertisements

शिरसाट काय म्हणाले?

औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना शिरसाट म्हणाले की, “अत्यंत चुकीचा रिपोर्ट सुनील केंद्रेकर यांनी काढला आहे. त्यांनी जो अहवाल दिला आहे, त्यावरून संताप डोक्यात गेलेला आहे. या अहवालाची चौकशी करा, जर तो खरा असेल त्यानुसार कारवाई केली पाहिजे. जर तो चुकीचा रिपोर्ट असेल शेतकऱ्यांना आत्महत्यासाठी प्रवृत्त करणारा हा रिपोर्ट असेल तर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी मुख्यमंत्र्याकडे कालच याबाबत मागणी केलेली आहे. तर विभागीय आयुक्त म्हणून तुमची काही जबाबदारी नव्हती का?, नोकरी गेल्यावर पोपटासारखे काय बोलता? शेतकरी उभा कसा राहील, याकडे लक्ष द्या, शेतकरी आत्महत्या कसे करतात याकडे तुमचे लक्ष आहे का? असे शिरसाट म्हणाले. तर तुमची राजकीय व्यक्तींसारखा स्टेटमेंट आणि अहवाल देतायत. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. जर अहवाल चुकीचा असेल तर निश्चित गुन्हा दाखल केला जाईल. सुनील केंद्रेकर यांच्या विरोधात ईडीची चौकशी चालू असल्याचे शिरसाट म्हणाले आहे.

काय केंद्रेकरांचा अहवाल?

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्ह्यात एक सर्वेक्षण केला होता. यामध्ये एकूण 10 लाख शेतकरी कुटुंबाची माहिती भरुन घेण्यात आली होती. सर्वेक्षण करताना प्रश्नांचे एकूण बारा विभाग करण्यात आले. यात एकूण 104 प्रश्नांची माहिती अधिकाऱ्यांमार्फत भरुन घेण्यात आली. यात आत्महत्या करण्याच्या विचारत असलेल्या शेतकऱ्यांची वेगळी यादी तयार करण्यात आली. तर एकूण 10 लाख शेतकरी कुटुंबांपैकी 1 लाख 5 हजार 754 शेतकरी कुटुंब अति संवेदनशील यादीत म्हणजेच आत्महत्या करण्याच्या विचारत असल्याचे समोर आले आहेत. तर 2 लाख 98 हजार 51 शेतकरी कुटुंब संवेदनशील आढळून आली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

राज्य शिक्षा केंद्र ने दिए पूर्व बी आर सी, ओ पी जोशी के कार्यकाल की जांच के निर्देश

राज्य शिक्षा केंद्र ने दिए पूर्व बी आर सी, ओ पी जोशी के कार्यकाल की …

चित्रपटाची ऑफर नाकारुन झाल्या उपजिल्हाधिकारी

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील अधिकारी आहेत. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *