Breaking News

वनाधिकाऱ्याला अटक : चंद्रपूरातील वाघांच्या शिकारीचे दिल्ली कनेक्शन

Advertisements

राज्यातील वाघांच्या शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वनाधिकारी मिश्राम जाखड (८१) यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. जाखड यांचे शिकारी टोळीशी संबंध असल्याचे आणि या टोळीने चंद्रपूरातील सावली परिसरात २ पूर्ण वाढ झालेल्या वाघांची शिकार केल्याचे समोर आले आहे. तेलंगणा राज्यातील करीमनगर येथून अटक करण्यात आलेल्या व सध्या गडचिरोलीतील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या १३ आरोपींची वनविभागाच्या विशेष कार्यदलाद्वारे (स्पेशल टास्कफोर्स) चौकशी केली जात आहे.

Advertisements

चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे देशभरातील संबंधित व्यक्तींवर वनविभागाद्वारे पाळत ठेवण्यात येत होती. यात याद्वारे शिकारी टोळींचे एका विशेष व्यक्तीशी आर्थिक संबंध असल्याची बाब उघडकीस आली. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत सेवानिवृत्त वनाधिकारी मिश्राम जाखड यांना ३१ जुलै रोजी अटक केली. महाराष्ट्र वनविभागाने तांत्रिक तपास करून आरोपीचे शिकाऱ्यांशी असलेले आर्थिक संबंध उघड केले आहे.

Advertisements

जाखड यांच्याशी आमची ओळख दिल्ली सरकारच्या दोन वन्यजीव निरीक्षकांनी करून दिली होती आणि त्यांनी आम्हाला त्याला नोकरी देण्याची विनंती केली. त्यांच्या शिफारशीमुळेच भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेने (डब्ल्यूपीएसआय-वाईल्डलाई फ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया) त्याला सुरुवातीला तीन महिने क्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्त केले. मात्र, आर्थिक अडचणीमुळे २०१० मध्ये त्याची सेवा बंद करण्यात आली. त्यानंतरही तो २०१० पासून अधूनमधून भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेला दूरध्वनी करून शिकारी आणि अवैध वन्यजीव व्यापाऱ्यांची माहिती देत असे. कोणतीही कारवाई करण्यायोग्य माहिती प्राप्त होताच अंमलबजावणी एजन्सींना ताबडतोब पाठवून दिली जात होती. याव्यतिरिक्त आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तेव्हापासून त्याने कोणत्या बेकायदेशीर कृती केल्या असतील याची आम्हाला माहिती नाही, अशी माहिती डब्ल्यूपीएसआय, मध्यभारतचे संचालक नितीन देसाई यांनी दिली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

आपत्तिजनक हालत में मिले पत्नी और उसके प्रेमी? पति ने कर दी दोनों की हत्या? आरोपी पुलिस गिरप्त में गया जेल

आपत्तिजनक हालत में मिले पत्नी और उसके प्रेमी? पति ने कर दी दोनों की हत्या? …

सब्जी खरीदने गई महिला के साथ गैंगरेप, 6 दिन तक दरिंदों के कब्जे में रही पीड़िता

सब्जी खरीदने गई महिला के साथ गैंगरेप, 6 दिन तक दरिंदों के कब्जे में रही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *