नागपुरातील भाजपा नेत्या सना खानचा मध्य प्रदेशात खून

नागपूर शहरातील भारतीय जनता पक्षाची सक्रिय पदाधिकारी सना खान हिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सनाच्या हत्याकांडात मुख्य आरोपी अमित शाहूचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली. त्याने सनाचा खून करून मृतदेह हिरन नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास जबलपूर पोलीस करीत आहे.

भाजपा नेत्या सना खान १ ऑगस्टला जबलपूरमधील मित्र अमित ऊर्फ पप्पू साहू याला भेटायला गेली होती. अमितच्या घरी मुक्कामी होती. अमितचा ढाबा आहे. दोघांत मधूर संबंध होते. त्यामुळे अमित शाहूच्या पोलीस दलात नोकरीवर असलेल्या पत्नीला संशय आला. २ ऑगस्टच्या दुपारपासून सना ही बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिच्या आईने मानकापूर पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

मानकापूर पोलिसांचे पथक जबलपूरला गेल्यानंतर अमित शाहू हा फरार झाला होता. त्याने ढाब्याला कुलूप लावले होते. नोकरांनीही तेथून पळ काढला होता. शेवटी पोलिसांनी तांत्रिक आधारे अमितचा नोकर जीतेंद्र गौड याला अटक केली. त्याने अमितच्या कारच्या डिक्कीत रक्त सांडलेले होते. ते रक्ताने माखलेली कारची डिक्की स्वच्छ केल्याची कबुली दिली. सना हिचा मृतदेह हिरन नदित फेकल्याचेही त्याने सांगितले. सना खान हत्याकांडाचे प्रकरण जबलपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून आरोपी जीतेंद्रलाही गोराबाजार-जबलपूर पोलिसांनी अटक केली.

जोपर्यंत सनाचा मृतदेह मिळत नाही, तोपर्यंत तिचा खून झाला असे म्हणता येणार नाही. परंतु, नोकराने दिलेल्या माहितीवरून सनाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया ठाणेदार शुभांगी वानखडे यांनी दिली.

About विश्व भारत

Check Also

बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई

बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

नाबालिक से दुष्कर्म : आरोपी को आजीवन जेल की सजा

नाबालिक से दुष्कर्म : आरोपी को आजीवन जेल की सजा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *