सिगारेटचे चटके देत मुलीवर बलात्कार : मुंडणही केले

गुंडप्रवृत्तीच्या २९ वर्षीय युवकाने १४ वर्षीय मुलीला सिगारेटचे चटके देऊन तिच्यावर अमानुष बलात्कार केला. हा धक्कादायक व माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार अकोला शहरातील कैलास टेकडी परिसरात घडला. आरोपीने पीडितेचे मुंडणही केले. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीने खदान पोलिसांना कारवाईची मागणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरूद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. गणेश चंद्रशेखर कुंभरे (२९) असे नराधम आरोपीचे नाव आहे.

शहरातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीची आरोपी छेड काढायचा. पीडितेच्या वडिलांनाही तो ठार मारण्याची धमकी देत होता. १५ नोव्हेंबरला पीडितेच्या घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने तिला सिंधी कॅम्प येथील स्मशानभूमीत नेले व सिगारेटचे चटके दिले. परिसरातील काही मुले मदतीसाठी आल्याने आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर आरोपीने दारू पिऊन पीडितेच्या घरी तिच्यावर बलात्कार केला. पीडितेला विद्रूप करण्यासाठी एका सलूनमध्ये नेले व तिचे मुंडण देखील केले. हा सर्व प्रकार पीडितेने आपल्या आई-वडिलांना सांगितला. गरीब कुटुंब व आरोपीने मारून टाकण्याची धमकी दिल्याने दोन दिवसांपासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला.

वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट यांनी महिला अध्यक्ष प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पुष्पा इंगळे, महानगर अध्यक्ष वंदना वासनिक, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन दांडगे, गणेश सपकाळ, युवक अध्यक्ष आशीष मांगूळकर, सुनंदा चांदणे यांच्यासह खदान पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना त्यांनी घटनेची माहिती दिली. यावेळी वंचितचे पदाधिकारी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक देखील उडाली.पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी गणेश कुंभरेविरूद्ध पोक्सो कायदा कलम ४ व ८ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला

राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!

‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *