शेतकऱ्यांच्या पिकांचा ई-पिक पाहणी कार्यक्रम राबविला जात आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करता यावी, यासाठी भंडारा जिल्ह्यात पिक पाहणीच्या कार्यक्रमास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडाऱ्यात केली.
ड्रोनच्या सहाय्याने फवारणीचे प्रात्यक्षिक बघितले, स्वतः ड्रोन हाताळले. समृध्दी महामार्ग भंडारा, गोंदिया, गडचिरोलीपर्यंत वाढविण्यात येत असून या मार्गाच्या डीपीआरचे काम वेगात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धानाला बोनस जाहीर करावा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभी केली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धान जलदगतीने खरेदी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सद्या सुरु असलेली खरेदी केंद्रे पुरेशी नसल्याने उर्वरित केंद्र सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिले.