Breaking News

आजपासून (सोमवार)थंडी आणखी वाढणार!

मिचाँग चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर आता भारताच्या बहुतांश भागात थंडीला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात जोरदार सक्रिय झाल्याने उत्तर ते मध्य भारत गारठण्यास सुरुवात झाली आहे. तेथील किमान तापमान 5 ते 10 अंशांवर खाली आले आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप थंडी नाही. राज्यात 18 डिसेंबरपासून थंडी सुरू होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. शुक्रवारी उत्तर भारतातील बहुतेक भागांमध्ये किमान तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअस इतके खाली आले होते. पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशात कडाक्याची थंडी व दाट धुके आहे. 16 डिसेंबरपासून पश्चिम हिमालयीन क्षेत्रावर पश्चिमी चक्रवात तयार होत आहे. त्यामुळे राज्यात शीतलहरी येण्यास 18 तारीख उजाडणार आहे.

राज्याचे गुरुवारचे तापमान..

मुंबई 22.8, रत्नागिरी 21.5, पुणे 14.0, अहमदनगर 14.3, जळगाव 15, कोल्हापूर 17.5, महाबळेश्वर 13.5, मालेगाव 16.0, नाशिक 14.2, सांगली 17.1, सातारा 15.3 सोलापूर 17.8, छत्रपती संभाजीनगर 14.6, परभणी 15.5, नांदेड 16.6, बीड 15.2, अकोला 17.2, अमरावती 15.3, बुलढाणा 15, ब—ह्मपुरी 15.1, चंद्रपूर 13.6, गोंदिया 13.2, नागपूर 14.4, वाशिम 14.6, वर्धा 16, यवतमाळ 16.5.

About विश्व भारत

Check Also

राज्यभरात पावसाचा इशारा : सोमवारनंतर जोर वाढणार

राज्यात अनेक भागात पावसाची हजेरी लगण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर मुंबईतही पावसाळी वातावरण …

भालू की मौत मामले में वन विभाग के तीन कर्मचारी सस्पेंड

भालू की मौत मामले में वन विभाग के तीन कर्मचारी सस्पेंड   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *