देशात थंडीचे आगमन होताच कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आज (दि.१७) भारतात 335 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यासह, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,701 वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकाद्वारे दिली आहे.
आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड-19 चे रुग्ण 4 कोटी 50 लाख 4 हजार 816 वर पोहोचले आहेत, तर देशात 5 लाख 33 हजार 316 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बरे होण्याचा दर?
याशिवाय कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. देशातील 4 कोटी 44 लाख 69 हजार 799 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील बरे होण्याचा दर 98.81 टक्क्यांवर पोहोचला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने पत्रकात नमूद केले आहे.तर महाराष्ट्रात अजून कुठेही रुग्ण आढळला नसल्याचे समजते.