नागपुरात धावत्या रेल्वेत 6 जणांनी लुटले प्रवाशांना

पुणे-हटिया रेल्वेत तृतीयपंथीयांच्या वेशात आलेल्या 6 जणांनी प्रवाशांना लुटल्याचा प्रकार नागपूरमध्ये घडला.त्यांच्याकडून 10 जणांना मारहाणही करण्यात आली. ही घटना नागपूरमध्ये गुरुवारी पहाटे घडली. एका महिलेने त्यांना पैसे नसल्याचे सांगितल्यावर तिचे 1 वर्षाचे बाळ हिसकावण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचे प्रवाशांनी पत्रकारांना सांगितले.

पुणे-हटिया रेल्वे बुधवारी सकाळी अकरा वाजता पुण्यावरून निघाली. मध्यरात्री बाराच्या सुमारास वर्धा स्टेशनवर गाडी आल्यावर जनरल कोचमध्ये 6 लुटारू चढले. त्यांनी टाळ्या वाजवत प्रवाशांकडे पैसे मागायला सुरुवात केली. प्रत्येकाने किमान 500 रुपये द्यावेत, असा हट्ट धरला. पैसे न देणार्‍यांना बेदम मारहाण करत होते. त्यांनी 10 प्रवाशांना मारहाण केली. मध्यरात्री दीडच्या सुमारास आजनी-नागपूर दरम्यान रेल्वेचा वेग कमी झाल्यावर उतरून सर्व लुटारू पसार झाले. लुटारूंपैकी एकाच्या हातात पिस्तूल होते. त्यामुळे कुणीच विरोध करू शकले नाही, असे प्रवाशांनी सांगितले.

About विश्व भारत

Check Also

आतंकवाद के खिलाफ महादुला-कोराडी बंद सफल:शहीदों को श्रद्धांजलि

आतंकवाद के खिलाफ महादुला-कोराडी बंद सफल: शहीदों को श्रद्धांजलि टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

भाजप आमदाराची समृद्धी महामार्गावरून नाराजी

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंप, रेस्टॉररन्ट्स, हॉटेल्स नसल्याने होणाऱ्या गैरसोयींबाबत या मार्गावरून प्रवास करणारे नाराजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *