Breaking News

नागपूर जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांनी का केले लेखणी बंद आंदोलन सुरु? वाचा

Advertisements

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तृतीय श्रेणी कर्मचारी सध्या लेखणीबंद आंदोलन करीत आहे. कळमेश्वर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर कारवाई करा ही त्यांची मागणी आहे. मंगळवारी त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस होता.

Advertisements

कळमेश्वरतहसील कार्यालयात प्रितम शेंडे महसूल सहायक पदावर कार्यरत आहेत. ते कार्यालयात काम करीत असताना त्यांना स्थानिक दोन नागरिकांनी त्रयस्तांच्या कामाबाबत विचारणा केली आणि “ कामकाज जमत नसेल तर राजीनामा द्या”अशी धमकी दिली. तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत शेंडे यांनी कळमेश्वर पोलिसांकडे तक्रार केली ली असून त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्याला अटक न झाल्याने नागपूर जिल्हा महसूल तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेने १५ जानेवारीपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे.

Advertisements

यापूर्वीसुद्धा संबंधितांना कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत कामकाजात अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करावी,अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र ढोमणे यांनी केली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महादूला येथे कार्यक्रमांचा समारोप

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समीती महादुला तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झेंडा चौक …

श्रीक्षेत्र कोराडी तीर्थ हनुमान मंदिर प्रांगण में अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड

श्रीक्षेत्र कोराडी तीर्थ हनुमान मंदिर प्रांगण में अभि इंजिनियरिंग कार्पोरेशन की ओर से संगीतमय सुंदरकांड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *