Breaking News

धक्कादायक!पुरुषांनाही होऊ शकतो स्तनाचा कर्करोग

Advertisements

स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगाचा सर्वांत धोकादायक आणि आक्रमक प्रकार आहे. आता पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो हे स्पष्ट झाले आहे. खरे तर पुरुषांमध्ये आढळणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण हे (Male Breast Cancer) स्तनाच्या कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी ०.५ – १ टक्का इतके आहे. “हा एक दुर्मीळ रोग आहे; जो पुरुषांसाठी धोकादायक आहे. पण, अलीकडील विविध अभ्यासांनुसार- पुरुषांमध्ये कर्करोग होण्याच्या घटना हळूहळू वाढत आहेत. त्यामुळे याबाबत लोकांना जागरूक करण्याची गरज निर्माण झाली आहे,” असे ‘न्यूबर्ग सेंटर फॉर जीनोमिक सेंटर’च्या मॉलिक्युलर ऑन्को पॅथॉलॉजिस्ट डॉ. किंजल पटेल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती देताना सांगितले.

Advertisements

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार- “पुरुषांना होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाचे निदान सामान्यतः वाढत्या वयात केले जाते. कारण- पुरुष त्यांच्या स्तनांमध्ये होणारी कोणतीही गाठ किंवा सूज याकडे दुर्लक्ष करतात. “ साधारणपणे वयाच्या ६० वर्षांपासून हा कर्करोग उदभवण्याची शक्यता असते आणि मग जसजसे वय वाढत जाते तसतसा हा धोका वाढतो. या रोगाची जास्तीत जास्त प्रकरणे ७०-७५ वर्षे वयोगटात आढळतात,” असे डॉ. पटेल यांनी सांगितले.

Advertisements

‘Goyal et.al’ यांनी २०२० रोजी केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले, “या वयोगटातील साधारण ८१ टक्के पुरुषांना स्तनांच्या कर्करोगाच्या लक्षणांबाबत आणि लवकर व वेळेवर निदाण करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात याबाबत माहीत नव्हते. डॉक्टर सांगतात, “आपण अशा काळात आहोत की, जिथे कर्करोगाच्या प्रारंभिक टप्प्यात हस्तक्षेप करून, अचूक औषधे देता येऊ शकतात. अशा वेळी पुरुषांना होणाऱ्या स्तनांच्या कर्करोगामधील जोखीम घटक लक्षात घेऊन, त्याबाबत वेळीच रोगनिदान केले, तर त्यावर लवकर उपाय करता येऊ शकतात हे समजून घेणे आवश्यक आहे.”

“अहमदाबाद येथील ‘न्यूबर्ग सेंटर फॉर जीनोमिक मेडिसिन’ (NCGM)ने स्तनाच्या कर्करोगाच्या जागरूकतेचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये असे आढळून आले की, २३१ व्यक्तींच्या (स्त्री आणि पुरुष) समूहातील सुमारे ७८ टक्के व्यक्तींना पुरुषांना होणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाबाबत माहीत नव्हते,” असे डॉक्टर पटेल यांनी सांगितले.

पुरुषांना होणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाबाबत जोखीम वाढविणारे घटक काय आहेत?

डॉ. पटेल यांनी सांगितले, “पुरुषांना होणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाबाबत जोखीम वाढविणारे अनेक घटक आहेत. जसे की, जीवनशैलीचे घटक, व्यावसायिक कारणामुळे कार्सिनोजेन्सच्या (carcinogen) म्हणजे कर्करोगकारक घटकांच्या संपर्कात येणे, कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असेल, तर आणि आनुवंशिकता इ. बहुतेक प्रकरणांमध्ये पुरुषांना होणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाचे कारण कौटुंबिक इतिहास, इस्ट्रोजेनची उच्च पातळी, वाढलेले वय व काही विशिष्ट गुणसूत्र विकृती जसे की, क्लाइनफेल्टर सिंड्रोम(Klinefelter syndrome) हे असू शकते. क्लाइनफेल्टर सिंड्रोम म्हणजे जेव्हा पुरुषांमध्ये अतिरिक्त एक्स गुणसूत्र येते, त्या स्थितीला ‘क्लाइनफेल्टर सिंड्रोम’, असे म्हणतात. सर्वसामान्यपणे पुरुषांमध्ये एक्स आणि वाय अशी दोन प्रकारची गुणसूत्रे असतात. पण, या स्थितीत पुरुषांमध्ये दोन्ही गुणसूत्रे एक्स हीच असतात.

ज्या सुमारे २० टक्के पुरुषांना स्तनाचा कर्करोग होतो, त्यांना BRCA1 किंवा BRCA2 जनुक (gene) किंवा CHECK2, PTEN किंवा PALB2 सारख्या उच्च जोखमीच्या जनुकांमध्ये उत्परिवर्तन (Gene Mutation) होऊ शकते,”

डॉक्टर हेदेखील स्पष्ट करतात, “BRCA2 जनुक उत्परिवर्तन असलेल्या पुरुषांमध्ये BRCA1 जनुक उत्परिवर्तनाच्या तुलनेत (१०० पैकी एक) स्तनाचा कर्करोग होण्याची उच्च शक्यता (१०० पैकी सात) असते. पण हे लक्षात घ्यावे की, BRCA1 व BRCA2 आणि इतर आनुवंशिक कर्करोगाचा धोका असलेल्या स्तन कर्करोगग्रस्त पुरुषांना आनुवंशिक समुपदेशन घेणे आणि चाचणी करणे आवश्यक आहे.

“विशेषत: कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असेल, तर स्तनांच्या कर्करोगाची तपासणी करणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला रोग होण्याआधीच त्याचे निदान होण्याची मदत मिळते. परिणामत: त्यामुळे रोगाची प्रगती कमी होण्यास आणि वेळेत योग्य उपचार मिळणे शक्य होते,” असा सल्ला डॉक्टर याबाबत देतात.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कमलिनी जड़ की सब्जी का मटन से अच्छा लजीज स्वाद : चखकर मनपसंद लडका रिश्ता पक्का करेगा!

कमलिनी जड़ की सब्जी का मटन से अच्छा लजीज स्वाद : चखकर मनपसंद लडका रिश्ता …

उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पित असाल तर..!

शरीरातील पाण्याची पातळी राखणे हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तज्ज्ञ रोज १० ते १२ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *