Breaking News

अधिकाऱ्यांना तुरुंगात बंद करणे हाच पर्याय : नागपूर हायकोर्टाचे ताशेरे

Advertisements

‘प्रत्येक सुनावणीत तुमच्यावतीने पोकळ आश्वासने दिली जातात. प्रत्येक सुनावणीत नव्याने शपथपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागता, मात्र शपथपत्रात सारखीच माहिती सादर करता. किती वेळा तुम्ही संधी मागणार,याला काही मर्यादा असायला हवी. तुमच्या अधिकाऱ्यांना तुरुंगात बंद करणे हाच पर्याय दिसत आहे. न्यायालयाशी तुम्ही वारंवार खेळत आहात, अशा तीव्र शब्दात न्यायालयाने उपस्थित अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. कत्तलखाना निर्माणाचा आराखडा कुठे आहे? भूसंपादनाची स्थिती काय? निधी कोण देणार आहे? असे अनेक सवाल न्यायालयाने उपस्थित केले. महाधिवक्ता यांनी शासनाच्यावतीने बाजू सांभाळण्याचे पुरेपुर प्रयत्न केल्यावर न्यायालयाने राज्य शासनाला अंतिम संधी देत दोन आठवड्यात प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

Advertisements

काय आहे प्रकरण?

Advertisements

कामठी येथे कत्तलखाना निर्माण करण्यासाठी आठ वर्षांपूर्वी न्यायालयाने आदेश देऊनही काही ठोस पाऊले उचलली गेली नाही. याप्रकरणी गुरुवारी महाधिवक्ता डॉ.बिरेंद्र सराफ यांनी राज्य शासनाच्यावतीने चूक कबूल करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष बिनशर्त माफी मागितली. ‘निर्माण कार्यात झालेल्या दिरंगाईचा बचाव केला जाऊ शकत नाही. आम्ही माफी मागण्याचा अधिकारही गमावला आहे, मात्र न्यायालयाने आम्हाला शेवटची संधी द्यावी, आता तक्रारीसाठी जागा देणार नाही’, अशा शब्दात महाधिवक्ता यांनी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या उपस्थितीत न्यायालयापुढे क्षमायाचना केली.

उच्च न्यायालयाने ३ मार्च २०१६ रोजी ऑल इंडिया जमैतुल कुरेशी संघटनेची जनहित याचिका निकाली काढताना कामठी येथे तातडीने कत्तलखाना बांधण्याचा आदेश दिला होता. परंतु, त्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही संघटनेने याप्रकरणी २०१८ मध्ये अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता दृकश्राव्य माध्यमातून तर नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर प्रत्यक्षपणे न्यायालयात हजर होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पदभरती रखडली : आचारसंहितेनंतर नियुक्ती मिळणार?

राज्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. शासनाकडून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु आचारसंहितेमुळे नियुक्ती …

भ्रष्टाचार : जिल्हा परिषदेत एकाच कामाची दोन बिलं मंजूर

जिल्हा परिषदेतील आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालक्यातील काही कामांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *