Breaking News

लोकसभा जागा वाटपासाठी अमित शाह आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

Advertisements

BJP नेते आणि गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. 5 आणि 6 मार्च रोजी अमित शहा मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अकोल्यात असणार आहे. अमित शाह जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. सुरुवातीला अकोला त्यानंतर जळगाव आणि संध्याकाळच्या सत्रात संभाजीनगरमध्ये अमित शाहांची जाहीर सभा होणार आहे. परंतु या दौऱ्यास सर्वात महत्वाचा प्रश्न अमित शाह निकाली लावणार आहे. महायुतीचे जागावाटप अमित शाह सोडवणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जास्त जागा मागितल्या गेल्यामुळे भाजपसमोर अडचण निर्माण झाली आहे. त्यावर आता अमित शाह तोडगा काढणार आहे.

Advertisements

 

मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह बैठका घेणार आहेत. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर या बैठका होणार आहेत. त्या बैठकांवर पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणार आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यात सर्वात महत्वाचा विषय महायुतीचा जागा वाटपाचा आहे. हे जागा वाटप न झाल्यामुळे भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केली नाही.

Advertisements

महायुतीत जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. महायुतीत भाजपने ३० ते ३२ जागा लढवाव्यात, असे केंद्रीय नेत्यांचे मत आहे. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून एकूण ३८ जागा मागितल्या गेल्या आहेत. त्यामुळे भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. आता मित्रपक्षांची मागणी कमी करुन भाजप ३० जागा आणि उर्वरित मित्रपक्ष १८ जागा लढवण्याचा तोडगा काढण्याचा प्रयत्न अमित शाह करणार आहे. त्यासाठी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

छत्रपती संभाजीनगरमध्ये सेनेच्या चंद्रकांत खैरेचं पारडं जड?भुमरे आणि जलील यांचे काय होणार?

मराठवाड्याची राजधानी अशी छत्रपती संभाजीनगर शहराची आजची ओळख असली तरी ती पहिली ओळख नाही. हे …

“क्या शिवसेना चिल्लर पार्टी है?” विलय को लेकर शरद पवार की टिप्पणी पर बढ़ा बवाल? जानिए किसने क्या कहा

“क्या शिवसेना चिल्लर पार्टी है?” विलय को लेकर शरद पवार की टिप्पणी पर बढ़ा बवाल? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *