Breaking News

रामटेकची उमेदवारी कुणाला?नितीन गडकरी, पंकजा मुंडेंसह २० जणांची नावं जाहीर

Advertisements

भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यादीत नितीन गडकरी, पंकजा मुंडेंसह महाराष्ट्रातल्या २० उमेदवारांची नावं आहेत. सुधीर मुनंगटीवार, मुरलीधर मोहोळ यांनाही लोकसभेचं तिकिट देण्यात आलं आहे. तर मुंबईतून गोपाळ शेट्टींचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच लोकसभेत नशीब आजमावण्याची संधी बीडमधून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या २० जणांची नावं भाजपाने जाहीर केली आहेत. आता आणखी किती जागा भाजपा घेणार आणि शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या वाट्याला किती जागा येणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Advertisements

 

महाराष्ट्र भाजपा उमेदवारांची यादी

Advertisements

हिना गावित-नंदुरबारसुभाष भामरे-धुळेस्मिता वाघ-जळगावरक्षा खडसे-रावेरअनुप धोत्रे-अकोलारामदास तडस-वर्धानितीन गडकरी-नागपूरसुधीर मुनगंटीवार-चंद्रपूरप्रतापराव चिखलीकर-नांदेडरावसाहेब दानवे-जालनाभारती पवाण-दिंडोरीकपिल पाटील-भिवंडीपियूष गोयल-उत्तर मुंबईमिहिर कोटेचा-मुंबई उत्तर पूर्वमुरलीधर मोहोळ-पुणेसुजय विखे पाटील-अहमदनगरपंकजा मुंडे-बीडसुधाकर श्रृंगारे-लातूररणजीत सिंह नाईक निंबाळकर-माढासंजयकाका पाटील-सांगली

 

 

हिमाचल प्रदेशात दोन उमेदवार, कर्नाटकातले २० उमेदवार, मध्यप्रदेशातले पाच उमेदवार, त्रिपुरातला एक उमेदवार, महाराष्ट्रातले २० उमेदवार आणि तेलंगणमधले ६ उमेदवार अशी ७० नावं या यादीत आहेत. या आधी जी यादी जाहीर करण्यात आली त्या यादीत १९५ नावं होती. नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत का नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सातत्याने उपस्थित केला होता. तसंच त्यांना भाजपाला लाथ मारा आणि महाविकास आघाडीसह या अशी ऑफरही उद्धव ठाकरेंनी दिली होती. नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंकडून देण्यात आलेल्या या ऑफरची देवेंद्र फडणवीस यांनी खिल्लीही उडवली होती. आता दुसरी यादी जाहीर झाली असून त्यात भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केल्याचं दिसून येतं आहे. रामटेकची उमेदवारी कुणाला मिळणार? हे अद्याप जाहीर झालेले नाही.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शरद पवार ने अपनी साख बचाने के लिए नवनीत राणा का जिक्र कर जनता से मांगी माफी

शरद पवार ने अपनी साख बचाने के लिए नवनीत राणा का जिक्र कर जनता से …

DCM फडणवीस को बड़ा झटका, चुनाव के दौरान शरद पवार ने कर दिया खेल

DCM फडणवीस को बड़ा झटका, चुनाव के दौरान शरद पवार ने कर दिया खेल टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *