Breaking News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर संपन्न

Advertisements

भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या जयंती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर संपन्न

Advertisements

टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट

Advertisements

कोराडी। क्रांतिवीर श्यामलाल बाबू श्रीवास स्मृती बहुद्देशीय संस्था द्वारे गोडबोले चौक, श्रीवास नगर, महादुला येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती प्रित्यर्थ परिसरातील नागरिकांरिता मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबीर आयोजित करण्यात आले ज्यामध्ये स्त्री रोग तपासणी, बालरोग तपासणी, नेत्र रोग तपासणी, दंत रोग तपासणी, सामान्य रोग तपासणी, अस्थी रोग तपासणी, शल्य चिकित्सा, ब्लड प्रेशर, मधुमेह, कान नाक घसा याप्रकारच्या तपासण्या करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे उदघाटन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन मा. राजेशजी रंगारी, माजी नगराध्यक्ष यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थिती म्हणून पुरुषोत्तम वारजूरकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महानिर्मिती, सरपंच भाऊरावजी गोमासे, सोनालीताई पडोळे, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद कार्यकारिणी सदस्या, महेश धुडस, पंकज ढोणे, मोहसीन शेख, प्रितम लोहासारवा, जितेश भगत, शब्बीर शेख, सारिका ताई झोड, नंदाताई तुरक, ममता वरठी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर यांच्या तर्फे सहभागी तज्ञ डॉ.अथर्व पांढरीपांढे, डॉ. नविन सोनवणे, डॉ. निशिगंधा राऊत, डॉ. वैष्णवी अदित्या,डॉ. अमोल घोडसे, डॉ. पायल निकोसे, डॉ. अश्विन बारसकर, डॉ. चेतन फुकटे व शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर यांच्या वतीने डॉ. शिल्पा वाऱ्हेकर व टिम, प्राथमिक आरोग्य केंद्र, गुमथी चे चमू व तसेच आशा वर्कर्स यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता संस्था अध्यक्ष राजेश मछले, शंकरजी शेंडे, बाबुलालजी मोटघरे, मुन्ना मेश्राम, विश्वनाथ चव्हाण, शिवप्रसाद नांगे, राहुल इंगोले, प्रफुल नारनवरे, स्नेहल मेश्राम, राजेश बोरकर, निरंजन वालदे, प्रितेश वानखेडे, सुमित मेघराज, बिपीन बागडे, विक्की खरवडे, मनोज शेंडे, सुनील शेंडे, सुरेंद्र मेश्राम, योगेश मेश्राम, अजय मानकर, शोभा इंगोले, निशा बागडे, आशा यादव, वर्षा तानोडे, निकिता लोणारे इ. अथक प्रयत्न केलेत.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संयोजक अमरजीत गोडबोले यांनी केले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद : शहरातील कोणता भाग प्रभावित होणार? वाचा

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद   कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा खंडित   नागपूरकरांसाठी एक …

BHEL को मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश

BHELको मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *