Breaking News

नागपूर : महादुला संघर्ष समितीतर्फे ५ लक्ष लीटर पाणी टाकीची मागणी

नागपूर : महादुला संघर्ष समिती तर्फे ५ लक्ष लीटर पाण्याची टाकीची मागणी

टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक रिपोर्ट

नागपुर जवळील महादुला येथील शिवाजीनगर, जवाहर नगर, आंबेडकर नगर, रमाई नगर, बाजार चौक, कौवापारा इत्यादी परिसरात पाणीटंचाई समस्या सोडवण्या करिता पाण्याची टाकीची मागणी *”महादुला संघर्ष समिती”* मार्फत मा.लोकनेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब, (विधानपरिषद आमदार तसेच माजी ऊर्जामंत्री उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री नागपूर महाराष्ट्र) व नगरपंचायत महादुला यांना देण्यात आले.

 

महादुला शहरात पाणीटंचाई असलेले जवाहर नगर, शिवाजीनगर, आंबेडकर नगर, रमाई नगर, बाजार चौक इत्यादी परिसरात पाणी टंचाई समस्या निर्माण झालेली आहे. लोकांना ताट वाट्यांमध्ये पाणी एकत्रित करून या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

सदर समस्या नगरवासीयांच्या वतीने “महादुला संघर्ष समिती” मार्फत आमदार विधान परिषद तसेच माजी मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या समोर मांडण्यात आली. या समस्येला लवकरात लवकर सोडवण्याकरिता मागणी केली असता लगेच बावनकुळे साहेबांमार्फत जिल्हाधिकारी व नगरपंचायत महादुला चे मुख्याधिकरी यांना पाच लक्ष लिटर क्षमता असलेली पाण्याची टंकी या भागातील नगरवासीयांकरिता देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.

सदर मागणी चा त्वरित विचार करता लवकरात लवकर पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली व सदर ची समस्या महाजेनको तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन नगरपंचायत मुख्याधिकारी मा. हांडा सहेबांमार्फत देण्यात आले.

 

या प्रसंगी महादुला संघर्ष समिती तर्फे सुधीर धूरीया (अध्यक्ष), आकाश उके (कार्याध्यक्ष), पंकज सोर (सचिव), प्रशांत मेश्राम (कोषाध्यक्ष), विक्की खिल्लारे (सहसचिव), मंगेश भिलावे (सहकोषाद्याक्ष), बापू भागवतकर, राहुल बागडे, अजय ईटकर, मनीष पवार, कमलाबाई डुकरे, रामेश्वर बनसोड व ईतर नगरवासी प्रामुख्याने उपस्थित होते.

About विश्व भारत

Check Also

BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मुलाच्या कारची पाच वाहनांना धडक : नागपुरात खळबळ

महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या मालकीच्या ऑडी कारने शहरात मध्यरात्री हैदोस घातला. दुचाकी आणि …

नागपूर : KTPS कंझूमर्स सोसाइटी अध्यक्ष विरुद्ध कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार

नागपूर : KTPS कंझूमर्स सोसाइटी अध्यक्ष विरुद्ध कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *