पावसाचे थैमान : नागपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

विदर्भात (Vidarbha) आज सकाळपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूरला (Chandrapur) आज रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आलेला आहे. तर नागपूर (Nagpur), गडचिरोली (Gadchiroli), वर्धा (Wardha), अमरावती (Amaravati) या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.

 

नागपूरमधील शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर

 

नागपूरच्या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी घेतला आहे. तर वाढत्या पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरच्या उमरेडमध्ये तरुणीचा बलात्कार करुन खून

नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये एक तरुणीवर प्रियकराने बलात्कार करुन तिचा खून केला .तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे एकच …

नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला

राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *