मतदान केंद्रात चप्पल घालून येणाऱ्यावर आचारसंहिता उल्लंघनचा गुन्हा होणार दाखल!

आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मतदान अधिकारी कर्मचारी आणि मतदारांना मतदान केंद्राच्या २०० मीटर पर्यंत चप्पल वापरण्यास बंदी करावी अशी अजब मागणी परंडा विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने केली आहे. परंडा विधासभा मतदारसंघातील एका उमेदवाराचे चिन्ह चप्पल आहे. त्यामुळे आचार संहितेचे पालन व्हावे म्हणून हे निवेदन दिले असल्याचे अपक्ष उमेदवार गुरूदास संभाजी कांबळे यांनी सांगितले आहे.

 

२४३ परंडा विधानसभा मतदारसंघात गुरूदास संभाजी कांबळे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. त्यांचा मतदान मशीनवरील मतानुक्रमांक १२ असून त्यांना निशाणी चप्पल मिळाले आहे. आदर्श आचारसंहिता नियमानुसार मतदान बूथ पासून २०० मीटरच्या आत कोणत्याही उमेदवाराचे चिन्ह प्रकाशित किंवा प्रदर्शीत करण्यास सक्त मनाई आहे. चप्पल घालून मतदान केंद्रात गेल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो व आचार संहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये म्हणून अपक्ष उमेदवार गुरुदास संभाजी कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी २४३ परंडा विधानसभा यांना माझी निशाणी चप्पल असून त्याचा प्रचार व प्रसार मतदान बूथ पासून २०० मीटरच्या आत आचार संहीता भंग होऊ नये याची मी स्वतः दखल घेत असून त्याकरिता दी.२०/११/२४ रोजी मतदानाच्या दिवशी मतदान बूथच्या २०० मीटर अंतरामध्ये कोणतेही कर्मचारी, पदाधिकारी, उमेदवार,व मतदार यांनी जर २०० मीटरच्या आत चप्पल घालून प्रवेश केल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

 

चप्पल ही माझी निशाणी असल्याने ती पायात घातल्याने माझा प्रचार व प्रसार लोकांनी चप्पल पायात घालून प्रवेश केल्याने होऊ शकतो. व आचार संहिता भंग होणार याच्यात शंका नाही. तरी मतदान बूथ पासून २०० मीटरच्या आत बुधवार दि. २०/११/२४ रोजी कोणत्याही व्यक्तीला चप्पल घालून प्रवेश न करु देणे हा आदर्श आचार संहितेचा भाग असून या नियमाचे पालन काटेकोरपणे करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

 

त्यामुळे २०० मीटरच्या आत चपला ठेवण्याची व्यवस्था करणे. व मतदारास २०० मीटर अंतरामध्ये पायाला कोणतीही दुखापत होऊ नये याबाबत सुव्यवस्था करावी. तसेच सदरील निशाणी ही चप्पला असून निशाणी म्हणून आपण कोणतीही एक डिझाईन देतो. परंतु चप्पला विविध डिझाईन मध्ये नागरिक घालतात आणी आपल्या निशाणीचा उल्लेख चप्पला असा आहे. त्यामुळे डिझाईनकडे लक्ष न देता उच्चराला महत्व द्यावे. व चप्पल घालून मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या आत प्रवेश दिल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याची आपण सर्व विधानसभा क्षेत्रात दखल घ्यावी असे लेखी निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी २४३ परंडा यांना दिले आहे.

 

या अजब मागणीमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासह मतदान अधिकारी कर्मचारी नेत्यांची मोठी अडचण होणार असल्याने. यावर निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. आता मतदान केंद्रात कर्मचारी, पदाधिकारी, मतदारांना चप्पला घालून प्रवेश मिळणार का ? का २०० मीटर वरून चप्पला काढून मतदान केंद्रात प्रवेश मिळणार हे पाहावे लागणार.

About विश्व भारत

Check Also

राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड

महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार …

अनिल देशमुख यांच्यावर कोणी केला हल्ला? मोठा दावा

विधानसभेचा प्रचार थंडावल्यानंतर काल नागपूरमध्ये राज्याच्ये माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *