Breaking News

आमदारांसाठी काँग्रेसचे विशेष विमान : भाजपची भीती

Advertisements

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळेच्या तुलनेत मतदान वाढल्याने काँग्रेसचा विजयाबाबतचा विश्वास दुणावला आहे. सोबतच निकालानंतर ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे.

Advertisements

 

राज्यात सरासरी ४ टक्क्यांहून अधिक मतदान वाढले आहे. सत्ताविरोधी भावना प्रबळ झाल्यास मतटक्का वाढतो, असा काँग्रेसचा दावा आहे. विदर्भातील ६२ जागांपैकी ३५ ते ४० जागा काँग्रेसला मिळतील, असा या पक्षाला विश्वास आहे. काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून आतापासूनच खबरदारी घेतली जात आहे. २३ नोव्हेंबरला निकाल समोर येताच आमदारांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. वडेट्टीवार यांच्यावर पूर्व विदर्भातील आमदारांच्या व्यवस्थेचीही जबाबदारी आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *