Breaking News

हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात डान्सबारमध्ये अश्लील नृत्य

बंदी असली तरी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात डान्सबार सुरु होत असतात. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात अनेक अवैध धंद्यांना ऊत येतो. मुंबई-दिल्लीतून वारांगना नागपुरात दाखल होतात तर अनेक दलाल सक्रिय होतात. अनेक फार्महाऊसवर नेत्यांच्या कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यात येते. तसेच शहरातील काही बीयरबारचे रुपांतर चक्क डान्सबारमध्ये होते.

एमआयडीसी रोडवरील ‘एस बार अँड रेस्ट्रॉरेंट’मध्ये गेल्या काही दिवसांपासून डान्सबार सुरु होता. बारमालक जय बलदेव हिराणी (४२, पांडे लेआऊट, खामला), राजू लालचंद झांबा (५९, महादेव हाईट्स,नारा, जरीपटका) आणि रोखपाल देवेंद्र रामकृष्ण शेंडे (३८, एकात्मतानगर, जयताळा) यांनी १० ते १५ तरुणींना डान्सबारमध्ये नृत्य सादर करण्यासाठी करारबद्ध केले. काही तरुणींना गीत गायनासाठी बोलावण्यात आले होते. या सर्व तरुणींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून तोकडे कपडे घालून आंबटशौकीन ग्राहकांसमोर नृत्य करण्यास भाग पाडले. यापैकी काही तरुणी बाहेर राज्यातील असून काही तरुणी नागपुरातील आहेत.

एमआयडीसीचे ठाणेदार महेश चव्हाण यांना माहिती मिळताच रविवारी रात्री दीड वाजता या बारमध्ये छापा घातला. या छाप्यात तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तसेच आंबटशौकीन ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. बारमालक जय हिराणीसह व्यवस्थापक आणि रोखपालावरही गुन्हे दाखल करुन ताब्यात घेण्यात आले.

शिशूपाल देशमुख, निलेश उईके, गौरव फलके, गोपाल दडवी, विशाल नाईक, श्रीकांत नगराळे, आशिष प्रधान, गणेश चाचेर, दीपक जयस्वाल, प्रशांत वंजारी, अभिषेक इंगळे, जेम्स डेनी, रामसिंग ठाकूर, शेखर मोहिते, नितीन शिंदे, मिलींद वाडेकर, राहुल रामटेके आणि उमेश रोहित सापा या आंबटशौकीन ग्राहकांना पोलिसांनी बारमधून ताब्यात घेतले.

एमआयडीसी रोडवरील ‘एस बार अँड रेस्ट्रॉरेंट’मध्ये सुरु असलेल्या डान्सबारवर पोलिसांनी छापा घातला. ८ ते १० तरुणी तोकड्या कपड्यात अश्लील हातवारे करीत आंबटशौकीन ग्राहकांसमोर नृत्य करीत होत्या तर ग्राहक तरुणींवर नोटा उडवत होते. यादरम्यान, पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात तरुणींना ताब्यात घेण्यात आले तर २१ आंबटशौकीन ग्राहकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

शहरात आणखी काही बारमध्ये ‘छमछम’

शहरातील काही बारमालकांनी पोलिसांच्या छाप्यातून वाचण्यासाठी सुगम-संगीताचा परवाना घेतला आहे. त्या परवान्याच्या आड तरुणींना अश्लील नृत्य करण्यास भाग पाडल्या जाते. अनेक मालक बारमध्ये नृत्य करणाऱ्या तरुणींकडून देहव्यापारही करवून घेतात. शहरातील काही ठिकाणी बिनधास्त डान्सबार सुरु असून गुन्हे शाखेच्या पथकाकडून अशा बारमालकाकडून वसुली केल्या जात असल्याची चर्चा आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपूर जिल्ह्यातून कोणत्या आमदाराला मंत्रिपद मिळणार?आठपैकी तब्बल…

तब्बल ११ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली व मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग …

नागपुरातील उड्डाण पुलावर १५ वाहने एकमेकांवर धडकली : २ तरुण…!

नागपुरातील सीताबर्डी परिसरामधील गोवारी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. जवळपास १२ ते १५ वाहने एकमेकांवर धडकली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *