Breaking News
Oplus_131072

अवैध वाळू उत्खननावर महसूल मंत्री बावनकुळे आणि पंकजा मुंडेत चर्चा

Advertisements

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व त्यांच्या साथीदारांचा बीड जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननातही सहभाग असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण मंत्री व बीड जिल्ह्यातील भाजप नेत्या पंकजा मुंडे यानी नागपुरात याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. एका खासगी कार्यक्रमासाठी मुंडे बुधवारी रात्री नागपुरात आल्या असता माध्यमांशी बोलत होत्या.

Advertisements

 

वाळू उत्खननासाठी आमच्या विभागाची पर्यावरणीय परवानगी लागते. मात्र तो विषय प्रामुख्याने महसूल विभागाचा आहे. वाळू उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याकडे आम्हाला लक्ष द्यावे लागते. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. अवैध वाळू उत्खननामुळे सरकारचे मोठे आर्थिक नुकसान होते. सोबतच स्थानिक पातळीवर गुंडागर्दी वाढते. मात्र वाळूचे मर्यादित उत्खनन करणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे नदी पात्राचे खोलीकरण केल्यास पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे वाळू उत्खननाच्या संदर्भात समतोल साधणे आवश्यक आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Advertisements

नद्यांचे पुनरूज्जीवन

नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आम्ही लोकांशी भेटत आहोत. लोकांकडून येणाऱ्या सूचनानुसार लवकरच नवीन नियोजन राज्यसमोर सादर करू, असे मुंडे यांनी सांगितले. नद्या दुर्लक्षित आहे, त्यांची जबाबदारी कोणीही घेत नाही. नदी राज्याची आणि देशाची संपत्ती आहे म्हणून आम्ही त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी नियोजन करत आहोत, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

RSS की रणनीति : पश्चिम बंगाल मे मिली बीजेपी को बड़ी जीत

RSS की वो रणनीति : पश्चिम बंगाल मे मिली बीजेपी को बड़ी जीत टेकचंद्र शास्त्री: …

सत्ता की दहलीज पर तामिलनाडु CM की रेस में अभिनेता विजय

सत्ता की दहलीज पर तामिलनाडु CM की रेस में अभिनेता विजय टेकचंद्र शास्त्री: 9822550220 चैन्नई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *