Breaking News

अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून १५ तोळ्यांचे दागिने पळवले

नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख व १५ तोळे सोन्याचे दागिने, असा ऐवज पळवला. ही घटना २२ मार्च रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत छत्रपती संभाजीनगरातील गारखेडा परिसरातील काबरानगर भागात घडली.

या प्रकरणी विजेंद्र कचरू खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार २२ मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास विजेंद्र खरात हे घराला कुलूप लावून कुटुंबासह नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून २ लाख २० हजार रुपये रोख, १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे नेकलेस, ७० हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण, ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे नेकलेस, २० हजार रुपये किंमतीचे कानातले झुंबर, ६० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या असा ७ लाख ७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.

About विश्व भारत

Check Also

पति के लिए प्यार सिर्फ दिखावा था : दरअसल दौलत से था प्रेम

पति के लिए प्यार सिर्फ दिखावा था : दरअसल दौलत से था प्रेम टेकचंद्र सनोडिया …

सिवनी जिला के आदिवासी वाहुल्य इलाकों में जमकर फल-फूल रहा है अवैध मौहा शराब का कारोबार

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:   सिवनी। मध्यप्रदेश की आध्यात्म नगरी सिवनी जिले के ग्रामीण भागों …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *