Breaking News

कोराडी वीज केंद्राच्या वसाहतीमध्ये साकारलं “मामाचं गाव”

Advertisements

कोराडी वीज केंद्राच्या वसाहतीमध्ये साकारलं “मामाचं गाव”

Advertisements

टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक

Advertisements

9822550220

 

नागपुर जिल्हाचे नागपुर येथील जीरो माइल ते 15 कि मई अंतरावर कोराडी मध्ये “हॅप्पी स्ट्रीट, मामाचं गाव” म्हणजे आनंद, एकता आणि सकारात्मकत ऊर्जेचा उत्सव: माजी प्रधान ऊर्जावान ऊर्जा मंत्री माननीय श्री चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब व सध्या वर्तमान महसूल मंत्री, तथा (पालकमंत्री नागपूर आणि अमरावती जिल्हा) यांचे

“हॅप्पी स्ट्रीट मामाचं गाव” कार्यक्रमात ५ ते 7 हजार व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग, मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन मोठ्यांना बालपणीचा आनंद तर लहानांना लुप्त झालेल्या खेळासह लाभलं निसर्गमय वातावरण. महाराष्ट्राच्या वीज निर्मितीतील प्रमुख घटक असलेले कोराडी औष्णिक विद्युत केंद्र, आज राज्यातील ऊर्जाक्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह आणि कार्यक्षम केंद्र म्हणून उदयास येत आहे. कोराडी केंद्राकडून उच्च कार्यक्षमता, उत्कृष्ट कामगिरी आणि शाश्वत वीज उत्पादन याबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत. महानिर्मितीच्या कार्यक्षेत्रात कोराडीचे योगदान दिवसेंदिवस वाढत असून, सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत कोराडी वीज केंद्र नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. कोराडी केंद्रासाठी लवकरच दोन नवीन युनिट्सच्या उभारणीचे प्रकल्प राबवले जाणार आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोराडी हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील अग्रगण्य वीज केंद्र म्हणून उदयास येईल.

अलीकडच्या काळात कोराडी वीज केंद्र आणि वसाहतीमध्ये विविध पायाभूत सुविधा उभारणीची कामे हाती घेण्यात आली असून, महाराष्ट्रातील सर्वाधिक महत्त्वाचे वीज केंद्र बनण्याच्या दिशेने कोराडी औष्णिक विद्युत केंद्राची वाटचाल करित आहे. अखंडित वीज उत्पादनाचे राष्ट्रीय कार्य करणाऱ्या कोराडी वीज केंद्राच्या अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी “हॅप्पी स्ट्रीट मामाचं गांव” त्यातील बालपणीचे खेळ, पारंपरिक खाद्यपदार्थ, लोककला आणि खेळांच्या माध्यमातून हा पारंपारिकतेशी जोडणारा मनोरंजनाचा सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन चंद्रशेखर बावनकुळे यांनी हॅप्पी स्ट्रीट मामाचं गाव, येथे बोलतांना व्यक्त करतांना केले. याप्रसंगी त्यांचेसह मेळघाट विधानसभा मतदार संघाचे आमदार केवलराम काळे, उपस्थित होते.

महानिर्मितीचे संजय मारुडकर संचालक (संचलन), अभय हरणे संचालक (प्रकल्प), मनेष वाघीरकर संचालक (वित्त), यांनी हॅप्पी स्ट्रीट मध्ये उपस्थितांना शुभेच्छा व्यक्त केल्या आणि “हॅप्पी स्ट्रीट मामाचं गाव” सारख्या कार्यक्रमांमुळे, हॅप्पीनेस इंडेक्स वाढवला असून, त्याचा थेट सकारात्मक परिणाम कामाच्या वातावरणावर होत असल्याचे व्यक्त केले.

पूर्वीच्या काळी मामाच्या गावाला जाऊन धमाल मस्ती करायची, गावाकडील निसर्गरम्य मातीशी नातं जोडीत, नात्यांची वीण अधिक घट्ट करायची अशी आपली संस्कृती. मात्र धकाधकीच्या जीवनात मामा देखील शहरात राहायला आल्याने मामाच्या गावचे कुतूहल काहीसे कमी झाले आणि ही जागा टी.व्ही., मोबाईल, सोशल मीडिया सारख्या आभासी दुनियेने व्यापल्याने जीवनाचा खरा-खुरा आनंदच दूर झाला. मानवी जीवन तांत्रिक झाले, यातून उदयास आलेली शहरी संकल्पना म्हणजे “हॅप्पी स्ट्रीट (मामाचं गाव)”. मामाच्या गावाला न जाता सुटीच्या दिवशी सकाळच्या प्रहरी मुख्य रस्त्यावरील रहदारी काही वेळापुरता इतरत्र वळवून त्याठिकाणी मनसोक्त खेळ, धमाल मस्ती करायची, हा यामागचा उद्देश.

महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या ५१ व्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिना निमित्ताने कोराडी विद्युत विहार वसाहतीतील कामगार मनोरंजन केंद्रालगतच्या सभोवताली रस्त्यावर “हॅप्पी स्ट्रीट” मामाचं गाव साकारण्यात आले. वीज केंद्राच्या अधिकारी-कर्मचारी व कुटुंबीयांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेषतः सुमारे ५ हजार व्यक्तींनी या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला.

हिरव्यागार वृक्षांच्या सावलीत, रंगबिरंगी फुगे, झेंडे, तोरणांनी रस्ते आकर्षक सजले होते. तर वयाचे भान विसरून, आपलं-परकं विसरून, प्रत्येकाने बालपणीच्या खेळाचा निखळ आनंद लुटला. नेहमी चारचाकी चालविणारा छकडा, बैलबंडी, चालवित होता तर माता-भगिनी, आपल्या मुलांना विसरून, लगोरी, दोरीवरच्या उड्या, तळ्यात-मळ्यात, झुले, पाळणे, मामाचं पत्र हरवलं, सापशिडी, तसेच जागोजागी लगतच्या झाडांवर लावेलेले दोरीचे  झुले, इत्यादी खेळांचा मनसोक्त आनंद घेत होत्या.

एरवी घरात बोलायला वेळ नसणारी पालक मंडळी “हॅप्पी स्ट्रीट” वर मात्र एकमेकांशी खुलून बोलताना दिसली तर मुले-मुली देखील आपले आई-वडील टायर, लोखंडी रिंग चालवित धावत असल्याचे पाहून नक्कीच चकित झाले. जात, पात, धर्म, वय, पद, दूर सारून प्रत्येक व्यक्ती स्वत:ला व्यक्त करीत नि:स्वार्थपणे सहभागी झाल्याचे दिसून येत होते. “हॅप्पी स्ट्रीट” च्या माध्यमातून अख्ख मामाचं गावच कोराडीत साकारण्यात आले होते. हिरव्यागार झाडयांच्या सावलीत मचान, झोपडी, निर्माण करुन सभोवताली प्रति शेती पिकवून अस्सल गावाचे वातावरण तयार करण्यात आले. झोपडी, मचान लगतच जंगल सफारीची अनुभूति देणारे छोटेसे जंगल आणि तळे तयार केले होते, त्यात जागोजागी ठेवलेली आणि अस्सल वाटणारी जंगली श्वापदे तर बच्चे कंपनीसाठी विशेष आकर्षण होते. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या विविध सेल्फी पॉईंट्स जवळ फोटो काढण्याची लगबग सर्वच वयोगटात दिसत होती.

कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून वसाहतींमधील भजनी मंडळींनी दिंडी काढली, विठ्ठल नामाच्या गजरात पावली झाल्याने वातावरणात अगदी भक्तिमय झाले होते.

चार तास कसे संपले कोणालाच कळाले नाही. घराकडे परतीची पाउले वळायला तयार नव्हती एवढा जीव “हॅप्पी स्ट्रीट” मामाच्या गावाने लावला.

या कौटुंबिक कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला त्याचे कारण लहान मुला-मुलींसाठी विविध खेळ, बक्षिसे, बुढ्ढी का बाल(शुगर कँन्डी), बंदुकीच्या गोळीने फुगे फोडणे, दोरीचे झुले,छकडा-रेंगी, बैलगाडी-गायवासरू, उंट, घोडगाडी, छकडा तर सर्वांसाठीच विशेष आकर्षण होते,  बॉल गेम्स, सापशिडी, टायर, तोफ, लोखंडी रिंग आणि वाहन चालविण्याचा आनंद देणारे तीन चाकाच्या , चार चाकाच्या लोखंडी गाड्या चालविण्याचा मनमुराद आनंद सर्वच वयोगटातील मंडळींनी घेतला, दोरीवरच्या उड्या,लहान सायकल, स्केटिंग तर तरुणी व महिलांसाठी टॅटू, बॅडमिंटन, फुटबॉल, लगोरी, दोरीवरच्या उड्या, कंबर रिंग, प्लेट थ्रो, रबर रिंग, पुरुष वर्गासाठी फुटबॉल,प्ले टथ्रो, बॅडमिंटन, क्रिकेट, बास्केट बॉल, फूटबॉल, रेखाचित्र, कंचे, भवरे, सेल्फी पॉईंट इत्यादी उपलब्ध होते.

फूड झोनमध्ये पारंपरिक आणि विविध खाद्यपदार्थांसह, उसाचा रस, ताज्या फळांचे सरबत, उपासाचे विविध पदार्थ, मोड कडधान्ये, भेळ, चना मसाला, पाणीपुरी, अश्या नानाविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी योगासन, भजन मंडळी, बुद्धिबळ, कॅरम, वृत्तपत्र, मासिके वाचन व झुम्बा डान्स थरार, ज्यामध्ये गाणे, नृत्य इत्यादी कला अनेकांनी  सादर केल्या. तसेच आपली कला सादर करण्यासाठी असलेल्या दुसर्‍या मंचावर अनेकांनी गीत गायन आणि आपल्या विविध कला सादर केल्या.

कार्यक्रमाला महानिर्मितीचे, संजय मारुडकर संचालक (संचलन), अभय हरणे संचालक (प्रकल्प), मनेष वाघीरकर संचालक (वित्त), मुख्य अभियंते, विवेक रोकडे (प्रकल्प), गिरीष कुमरवार, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, विलास मोटघरे, कोराडी औष्णिक विद्युत केंद्र, शरद भगत, पारस औष्णिक विद्युत केंद्र, श्री सुनील सोनपेठकर सेवानिवृत्त्त मुख्य अभियंता आणि पुरुषोत्तम वारजुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

उप मुख्य अभियंते सुदीप राणे, शैलेंद्र कासुलकर, भास्कर इंगळे, गजरलवार, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सीमा महल्ले, अधीक्षक अभियंते, किरण नानवटकर, सचिन भगेवार परिमल रामटेके, सारिका सोनटक्के, राजेश डाखोळे, मनोज उमप, देवेंद्र भादीकर, शिरीष वाठ, अतुल बोरकर उप महाव्यवस्थापक, डॉ. अमित ग्वालबंशी, प्रवीण मडावी, कल्याण अधिकारी मयूर मेंढेकर, देवेंद्र राठोड वरिष्ठ व्यवस्थापक (सुरक्षा), समन्वयक प्रवीण बुटे, सचिव संदीप ठाकरे,  हर्षद खंडारे आणि वीज केंद्रातील विभाग प्रमुख, संघटना पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, पुरुष-महिला मुले-मुली आणि सर्व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विलास मोटघरे यांच्या मार्गदर्शनाखाली हॅप्पी स्ट्रीट आयोजन समितीच्या सहकार्याने “हॅप्पी स्ट्रीट” (मामाचं गाव) कार्यक्रम अतिशय यशस्वीरीत्या संपन्न झाला.  कार्यक्रमाच्या यशस्वितेत “हॅप्पी स्ट्रीट” आयोजन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली तसेच स्थापत्य, विद्युत, अग्निशमन, सुरक्षा, समन्वय तसेच सर्व विभागांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रवीण बुटे, आर. जे. पूनम आणि सागर यांनी केले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

धर्म सांस्कृतिक का संगम है कोराडी क्षेत्र : गौतम खट्टर

धर्म सांस्कृतिक का संगम है कोराडी क्षेत्र : गौतम खट्टर   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

हिन्दुओं की चेतना का स्तर कितना गिर चुका है: डॉ.गौतम खट्टर के विचार

हिन्दुओं की चेतना का स्तर कितना गिर चुका है: डॉ.गौतम खट्टर के विचार टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *