Breaking News

नागपुरात भाजप, काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव

Advertisements

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपच्या दोन माजी आमदारांच्या कुटुंबीयांसह इतरही काही नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील शहरातील दिग्गज नेत्यांसह इतरही पक्षातील नेते वा त्यांच्या कुटुंबीयांना मतदारांनी नाकारले आहे.

Advertisements

 

भाजपने यंदाच्या तिकीट वाटपात विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलाला तिकीट नाकारले होते. मात्र मध्य नागपुरातील माजी आमदार विकास कुंभारे यांचा मुलगा श्रेयश, नाना श्यामकुळे यांचा मुलगा अमोल तसेच डॉ. मिलिंद माने यांच्या पत्नी डॉ. सरिता माने यांना तिकीट देण्यात आले होते. त्यापैकी नाना श्यामकुळे यांचा मुलगा अमोल विजयी झाला. परंतु विकास कुंभारे यांचा मुलगा श्रेयश आणि डाॅ. मिलिंद माने यांच्या पत्नी डाॅ. सरिता यांचा पराभव झाला.

Advertisements

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे आणि माजी आमदार प्रकाश गजभिये यांचा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. तर भाजप नेते व राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनाही नागरिकांनी नाकारले. भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष व ज्येष्ठ नेत्या प्रगती पाटील, माजी उपमहापौर सुनील अग्रवाल यांचाही निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचे निकटवर्तीय प्रकाश धवड यांचाही पराभव झाला. तसेच इतरही काही पक्षांतील काही माजी नगरसेवक वा त्यांच्या कुटुंबीयांना पराभवाचा धक्का बसला.

 

या दिग्गजांचाही पराभव…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रकाश गजभिये, भाजप नेते व राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, काँग्रेसचे योगेश तिवारी, भाजपचे प्रमोद चिखले, भाजपच्या विशाखा बांते, भाजपचे नवनीत सिंह तुली, काँग्रेसचे सतीश होले, अपक्ष विजय बाभरे, काँग्रेसचे संदेश सिंगलकर, माजी नगरसेवक तानाजी वनवे.

 

पॅनल विजयाचे प्रमाण जास्त

नागपूर महापालिका निवडणुकीत यंदा नागपुरातील सगळ्यात झोन परिसरातील विविध प्रभागातील आकडेवारी बघितल्यास नागरिकांनी एकाच पॅनल मध्ये उभे असलेल्या उमेदवारांना कल देण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसत आहे. तर निवडक ठिकाणी संमिश्र म्हणजे दोन वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडून आल्याचेही दिसत आहे. बहुजन समाज पक्षाला मात्र यंदाच्या निवडणुकीत चांगलाच फटका बसलेला दिसत आहे. त्यांचा केवळ एकच नगरसेवक यंदा निवडून आला आहे. मागच्या महापालिकेत बसप चे दहा नगरसेवक होते हे विशेष.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कैबिनेट मंत्री बावनकुळेके करकमलों “PM ई-बस” सेवा का उद्घाटन 

कैबिनेट मंत्री बावनकुळेके करकमलों “PM ई-बस” सेवा का उद्घाटन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर। …

वह नेता कौन? अजित पवार हादसे में खलबली

महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार की एक विमान हादसे में मौत के बाद 10 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *