माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री तथा शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या उमेदवारांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत काट्याची टक्कर झाली. यात दानवे यांनी सत्तार यांच्यावर आघाडी मिळवून बहुतांश ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या ६३ आणि पंचायत समितीच्या १२६ जागांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. आज (९ फेब्रुवारी) निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचा प्रभाव वाढताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील बहुतांश जागांवर भाजपा-शिंदेसेना यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळाला. यादरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील विजयी उमेदवारांची यादी समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत ७२.६९ टक्के एवढे मतदान झाले होते. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गेल्या महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने सर्वांनाच धक्का देत छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्विवाद यश मिळविले होते. त्यापाठोपाठ एमआयएमनेही जोरदार मुसंडी मारली होती, तर शिवसेना शिंदे व ठाकरे गटाला निवडणुकीत मोठा फटका बसला होता. यादरम्यान जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.
जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी
अजिंठा गट – आयेशा हुसेन सय्यद (शिंदे गट)
शिवणा गट – निकिता राजेंद्र काळे (शिंदे गट)
फर्दापूर गट – माहीम इद्रिस मुलतानी (भाजपा)
अंभई गट – आमेर अब्दुल सत्तार (शिंदे गट)
घाटनांद्रा गट – अर्जुन गाढे (शिंदे गट)
वडोद बाजार गट – गोपाल वाघ (भाजपा)
खुलताबाद गट – प्रतीक्षा कापसे (भाजपा)
वेरूळ गट – रेखा चव्हाण (भाजपा)
गदाना गट – कुणाल दांडगे (भाजपा)
हतनूर गट – मीनाक्षी पवार (भाजपा)
पंचायत समित्यांमधील विजयी उमेदवारांची यादी
अजिंठा गण – समी चाऊस (शिंदे गट)
शिवणा गण – शेख सलीम (शिंदे गट)
उंडणगाव गण – अनिता सुरेश बनकर (भाजपा)
पानवडोद गण – नेहा सुमित खरात (भाजपा)
फर्दापूर गण – राहुल राठोड (भाजपा)
सावळदबारा गण – उत्तम चव्हाण (भाजपा)
केळगाव गण – तुळशा कोठाळे (भाजपा)
अंभई गण – रजनीताई नगरे (भाजपा)
हळदा गण – कासाबाई पांडुरंग गवळे (भाजपा)
घाटनांद्रा गण – सोफिया इब्राहिम (शिंदे गट)
आमठाणा गण – रघुनाथ मोरे (शिंदे गट)
विश्वभारत News Website