Breaking News
Oplus_131072

रात्रभर जंगलात बलात्कार : महिलेनी कशी केली सुटका? थरारक अनुभव

Advertisements

एका महिलेने सोलो ट्रीपचा भयंकर अनुभव सांगितला आहे. ती महिला एकटीच ट्रीपला निघाली. पण तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला ज्यानंतर तिने रात्रभर जंगलात लपून बसत स्वतःची सुटका करुन घेतली. सोलो ट्रीपला जाण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र दिल्लीतल्या एका महिलेला आलेला अनुभव हा तिच्यासाठी सर्वात वाईट अनुभव ठरला आहे.

Advertisements

पोलिसांनी या महिलेबाबत काय सांगितलं?

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ वर्षांची ही महिला काठगोडाम या ठिकाणी दिल्लीतली ही महिला देहरादूनवरुन आली. त्यानंतर तिने नैनितालला जाण्यासाठी टॅक्सी घेतली. रात्री साधारण १.३० च्या सुमारास टॅक्सी चालकाने टॅक्सीचा मार्गच अचानक बदलला. पटवा डांगर या ठिकाणी जाण्याऐवजी तो दुसरीकडून जाऊ लागला. ज्यानंतर ही महिला म्हणाली की तू रस्ता का बदललास? त्यावेळी चालकाने टॅक्सी थांबवली आणि तिला शिवीगाळ करत मारहाण करु लागला. तसंच त्याने तिचा मोबाइल खेचला आणि महिलेवर बलात्कार करायचा प्रयत्न केला.

 

घाबरलेल्या महिलेने जंगल गाठलं

या प्रसंगाने घाबरुन गेलेल्या महिलेने सरळ समोर दिसणारं जंगल गाठलं. जंगलात तिने संपूर्ण रात्र काढली. शुक्रवारी सकाळी पटवा डांगर या गावात ती कशीबशी पोहचली. तिथल्या स्थानिकांची मदत घेत तिने घडल्या प्रकाराची नोंद पोलीस ठाण्यात केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एऩडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांची पथकं कामाला लावली. तसंच महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं. महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर सदर घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी केली. महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार पोलिसांनी बलात्काराचा प्रयत्न, दरोडा या प्रकरणाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 

महिलेचा मोबाइल सापडला, टॅक्सी चालकाचा शोध सुरु

दरम्यान सदर महिलेचा फोन पोलिसांनी बोरा या ठिकाणाहून ताब्यात घेतला आहे. तसंच पोलिसांनी टॅक्सीही जप्त केली आहे. नैनितालचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मंजुनाथ टी.सी. म्हणाले की पर्यटकांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. ज्या चालकाने हे कृ्त्य केलं त्याचा तपास आम्ही करतो आहोत. नैनितालच्या टॅक्सी मालकांना आमचं हे सांगणं आहे की जो चालक तुम्ही टॅक्सीवर ठेवत आहात त्याची आवश्यक ती कागदपत्रं जमा झाल्याशिवाय त्याला कामावर ठेवू नका. सदर महिलेसह जो प्रकार घडला तो निंदनीय आहे. त्या टॅक्सीचालकाचा शोध आम्ही घेत आहोत असंही वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी सांगितलं. सदर घटनेतील टॅक्सी आम्ही जप्त केली आहे. या टॅक्सीचा मालक वेगळा आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा करणाऱ्या चालकाचा शोध घेत आहोत असंही मंजुनाथ यांनी सांगितलं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर …

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *