आमदार व कृषी विभागाने केली शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी.
आर्वी:- कोरणा संसर्ग आजारामुळे व संचारबंदी यामुळे शेतकरी पुरता मोठा कुटीस आलेल्या असतानाच कसेबसे शेतातील पीक उभे केले मात्र या चार दिवसांमध्ये सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्याने आर्वी आष्टी कारंजा तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणावर उध्वस्त झाल्याने आमदार दादारावजी केचे व संबंधित यंत्रणेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
सध्याचे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट असून अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. त्यातही कसेबसे पिको उभे केले असतानाच सोयाबीन या पिकावर मोठा खर्च शेतकऱ्यांनी केल्यावर अचानक खोडमाशी या जंतूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाले. त्यामुळे आर्वी आष्टी कारंजा या तीनही तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर थेट आमदारांनी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली असता. शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था व शेतकऱ्यांचे विवंचने तील प्रत्यक्ष स्थिती डोळ्यासमोर उभी राहत होती. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आपली कैफियत आमदार दादाराव केचे यांच्याकडे मांडली असता आमदार दादाराव केचे यांनी थेट खडकी, किन्हाळा वाघोली, अंतोरा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. व शेतकऱ्यांचा संसारथ सुरळीत चालण्यासाठी व सध्या निर्माण झालेली बिकट स्थिती व शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता मायबाप सरकारने कुंभकर्णी झोपेत न राहता शेतकऱ्यांना सरसकट आर्वी आष्टी कारंजा या तीनही तालुक्यात तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची एक मुस्त मदत शासनाने तात्काळ द्यावी. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना थांबविण्यास मदत होईल. अशी मागणी आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी केली असून सदर प्रश्न मार्गी लागेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. शासनाने जर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे डोळेझाक पणा केली तर प्रसंगी शेतकऱ्यांसह आंदोलनात्मक पवित्रा देखील घेईल असा इशारा वजा मागणी दादाराव केचे यांनी केली.
शासनाकडे तात्काळ पाठपुरावा करून सभागृहात देखील शेतकऱ्यांच्या हिताची मागणी लावून धरणार असल्याचे दादाराव केचे यांनी सांगितले.
यावेळी आष्टी तालुका कृषी अधिकारी नडगेरी, पंचायत समिती कृषी अधिकारी हरिभाऊ सोर्ते, मंडळ कृषी अधिकारी कु. ए.जी. घरत, आत्मा सहाय्यक सागर ढवळे, कृषी सहाय्यक पी.जी. निंभोरकर, कृषी सेवक कु. स्वाती मेश्राम, तांत्रिक सहाय्यक ए. एस. भगत, ए. जी. धारपुरे, तलाठी जुगनाके, तलाठी शेख तसेच भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष सुरेश नागपुरे, आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास लव्हाळे, माजी सरपंच सुनील साबळे, गजानन भोरे, राहुल खैरनार, गजानन आंबेकर, मनोज आंबेकर, अतुल अंबेकर, गोरखनाथ भिवापू रे, सुधीर गुडघाणे, गिरीश वाघ, विजय डोळस, रोहित ठाकरे, किशोर आंबेकर, जीवन भिवापूरे, सुनील भडके, सचिन नागपुरे, निलेश नागपुरे, अनिकेत भडके, प्रीतम गायकी, किशोर गायकी आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.