चंद्रपूर(७ सप्टेंबर २०२०) : कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर व सतत वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे जिल्हाप्रशासन व आरोग्य यंत्रणा विचारात पडली असून मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी चंद्रपूर सह जिल्ह्यात लॉकडाउन राबविण्याचा संकल्प केला होता मात्र अनलॉक च्या प्रक्रियेमुळे तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय लॉकडाउन करता येत नाही तरी मात्र सातत्याने वाढणाऱ्या दररोजच्या १५० च्या रुग्णसंख्येचा विचार करता चंद्रपूर व बल्लारपूर शहरात १० सप्टेंबर २०२० ते १३ सप्टेंबर २०२० या ४ दिवसाचा जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे यामुळे वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न राहील या जनता कर्फ्यु अंतर्गत चंद्रपूर व बल्लारपूर शहरातील जीवनावश्यक वस्तू व सेवा तसेच शासकीय कार्यालये वगळता ईतर सर्व सेवा व आस्थापने बंद राहतील त्यामुळे नागरिकांनी व जनतेनी या जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या संदर्भात आज नियोजन भवन या ठिकाणी मा. विजयभाऊ वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री, तसेच पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली जनता कर्फ्यु संदर्भात बैठकीला पार पडली या बैठकीला विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते यानुसार चंद्रपूर व बल्लारपूर शहरात ४ दिवसात जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे मात्र यात जीवनावश्यक वस्तू व सेवा तसेच शासकीय कार्यालयांना सूट देण्यात आली आहे