Breaking News

मराठा आरक्षणाला स्थगिती,सुप्रीम कोर्टाचा अंतरीम आदेश

Advertisements

🔷मराठा समाजाला मोठा धक्का

Advertisements

नवी दिल्ली(दि.9सप्टेंबर):- सन २०२०-२०२१ या वर्षात मराठा समाजाला नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने आपल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे. मात्र प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत 2020-2021 या वर्षासाठी कोणतेही प्रवेश मराठा आरक्षणानुसार देऊ नये, पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे सोपवलं जावं, असं निकालात म्हटलं आहे. मराठा आरक्षण प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे जाणार की नाही यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. खरंतर
सकाळच्या यादीत हे प्रकरण नव्हतं. परंतु अचानक आज दुपारी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात लिस्ट करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली.

Advertisements

महाराष्ट्र सरकारच्यावतीने हे प्रकरण विस्तारित खंडपिठाकडे देण्याची विनंती केली होती. या प्रकरणात अनेक घटनात्मक मुद्दे आहेत.केंद्र सरकारच्या दहा टक्के आरक्षणाचे प्रकरण मोठ्या खंडपिठाकडे गेलेलं आहे.या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारने सुद्धा हे प्रकरण मोठ्या खंडपिठाकडे देण्याची विनंती केली होती.तर मोठ्या खंडपिठाकडे हे प्रकरण देणं म्हणजे वेळकाढुपणा असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.त्यामुळे आज झालेल्या सुनावणीत काय निकाल येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान , केंद्र सरकारच्या 10 टक्के आर्थिकद्रुष्ट्या दुर्बल आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणाला स्थगिती न देता ते घटनापिठाकडे सोपवता आलं असतं का, असा सवाल सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विचारला जात आहे.कारण गरिबांचे दहा टक्के आरक्षणही घटनापिठाकडे सोपवले आहे मात्र त्यांच्या आरक्षणाला स्थगिती दिलेली नाही.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

जरांगेचा सरकारवर दबाव : हायकोर्टात याचिका

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासह आयोगाच्या इतर सदस्यांच्या नियुक्तीला जनहित …

लोकसभा चुनाव कब होंगे? चीफ इलेक्शन कमिश्नर राजीव कुमार ने दिया बड़ा अपडेट

2024 लोकसभा चुनाव को लेकर चुनाव आयोग से तैयारियां पूरी कर ली हैं। मुख्य चुनाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *