बल्लारपूर : कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता आपले कर्तव्य बजावताना अनेक पत्रकार बांधवांना प्रसंगी कोरोनाची लागण झाली व यात काही पत्रकार बांधवांना मृत्यूलाही सामोरे जावे लागले यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार बंधूंना उपचार सुरू असताना व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावा तसेच पत्रकारांसाठी आयसोलेशनसाठी किमान 50 बेड आरक्षित करण्यात यावेत, पत्रकारांसाठी 50 लाखाचा विमा त्वरित काढण्यात यावा, कोरोना संक्रमन काळात मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या वारसांना 50 लाखांची तातडीने मदत करण्यात यावी तसेच पत्रकाराच्या कुटुंबियांनाही कोरोनाच्या उपचारार्थ बेड उपलब्ध करून देण्यात यावेत अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा बल्लारपूर च्या वतीने मा. तहसीलदार जे.बी.पोहणकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले यावेळी निवेदन देतांना राज्य कार्यकारिणी सदस्य श्री पद्माकरजी पांढरे, सुरेशजी रामगुंडे, प्रशांत विघ्नेश्वर, रमेश निषाद, विकास राजूरकर, अजय रासेकर, परिष मेश्राम, ज्ञानेन्द्र आर्य, देवेंद्र झाडे, प्रशांत भोरे ई ची उपस्थिती होती.
Check Also
नागपुरातील बारूद कंपनीत स्फाेट : कामगारांचा जागीच मृत्यू
नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …
१२ भाविकांचा मृत्यू : मौनी अमावस्येला महाकुंभात चेंगराचेंगरी : शाही स्नान रद्द
महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …