चंद्रपूर जिल्ह्यात (दि.9सप्टेंबर) 24 तासात आणखी 276 कोरोना बाधित – दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

🔺चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4662

चंद्रपूर(दि.9सप्टेंबर):- जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 276 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 662 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2 हजार 245 असून आतापर्यंत 2 हजार 364 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.

जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगांव येथील 60 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 7 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 8 सप्टेंबरला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तर दुसरा मृत्यु आझाद वार्ड वरोरा येथील 72 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 2 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 8 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. जिल्ह्यात आतापर्यंत 53 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 49, तेलंगाणा एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.

आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 136, राजुरा तालुक्यातील 6, वरोरा तालुक्यातील 9, बल्लारपूर तालुक्यातील 9, भद्रावती तालुक्यातील 12, गोंडपिपरी तालुक्यातील 7, पोंभूर्णा तालुक्यातील 21, कोरपना तालुक्यातील 7, सावली तालुक्यातील 17 , मूल तालुक्यातील 21, नागभीड तालुक्यातील 2, चिमूर तालुक्यातील 9, ब्रह्मपुरी तालुक्यातील 14, सिंदेवाही तालुक्यातील 4 तर वणी-यवतमाळ येथून आलेले 2 बाधित असे एकूण 276 बाधित पुढे आले आहेत.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *