महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातुन वर्धा जिल्हयातील माती विभागातील 10 व गादी विभागातील 6 कुस्तीपटूंना मानधनाचे वाटप
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- हिंगणघाटः भारत सरकारने क्रीडा व युवक कल्याण क्षेत्रात आमुलाग्र पणे बदल करुन विविध लोकप्रीय योजना भारत सरकारच्या माध्यमातून प्रारंभ केलेला आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात खेला इंडीयाच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ सर्व खेळाडूंना मिळणार आहे त्यामुळे सर्व स्तरातील खेळाडूना क्रीडाक्षेत्राचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येईल, वर्धा जिल्हयामध्ये जिल्हा क्रीडा कार्यालया अंतर्गत खेलो इंडीयांच्या माध्यमातुन तिन खेळाचा समावेश करण्यात आलेला असुन यामध्ये कुस्ती खेळाचा समावेश केला आहे तसेच देवळी येथील इनडोअर स्टेडीयम मध्ये कुस्ती प्रशिक्षण केन्द्र सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्यामुळे खेलो इंडीयाच्या माध्यमातुन कुस्ती खेळाला चांगले दिवस येणार आहे व महाराष्ट्र सरकारने सुध्दा प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहीत करण्यासाठी आर्थिक मदत देणे आवश्यक आहे, तसेच वर्धा जिल्हयातील खेळाडू राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्याकरिता खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले.
आज हिंगणघाट येथील उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातुन वर्धा जिल्हयातील माती विभागातील 10 व गादी विभागातील 6 कुस्तीपटूंना मानधनाचे वाटप खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार, प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लतीका माने, वर्धा कुस्तीगीर संघटनेचे सचिव मदनसिंग चावरे, नगरसेवक अंकुश ठाकुर उपस्थित होते. सर्व कुस्तीगीरांना मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी रु. 6000/- धनादेश देण्यात आला.
यावेळी आमदार कुणावार म्हणाले की, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात कुस्तीचे अनेक खेळाडू आहे, या कुस्ती खेळासोबतच इतर खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता पुढाकार घेणार आहे, तसेच हिंगणघाट येथे भव्य अशी हिंद केसरी स्पर्धा घेण्याचा मानस सुध्दा यावेळी त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी मनोज पंधराम तर उपस्थितांचे आभार सहा. क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी मानले, कार्यक्रमाला कुस्ती कोच सुप्रसिध्द बडगीलवार, माती विभागातील कुस्तीपटू रोहित घाटेकर, प्रज्वल सहारे, आशिष लोहाडे, विशाल कोकरे, रोहित लोहांडे, राजु डुकरे, रमाकांत गिहारे, नंदकुमार काकडे, जगदिश पेडकर, उमेश शिरतोडे माती विभागातील कुणाल बोडके, सौरभ नारनवरे, सम्राट कांबळे, तेजस कारवटकर, अक्षय तरंगे, संतोश जगताप उपस्थित होते.