वर्धा प्रतिनिधी :- कोरोणा काळात स्वताच्या कुटुंबाची पर्वा नकरता योध्दा म्हणून काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक यांना वेठबिगारीची वागणूक शासन प्रशासन देत असून आपल्या हक्कासाठी *आशा गट प्रवर्तकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रशासना कडे वारंवार विनंती केल्या परंतु शासन प्रशासन योग्य न्याय देत नसल्यामुळे नाईलाजाने शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर मागील १४ सप्टेंबर पासून बहिष्कार घालण्यात आला होता.आशा गटप्रवर्तक यांच्या प्रश्नावर २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या कक्षात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओम्बासे .प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रभाकर नाईक व आयटक राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाणे यांच्या उपस्थिती मध्ये चर्चा झाली .त्यात पिआयपी मध्ये आशा गटप्रवर्तक यांना २०००/ रुपये देण्यात यावे याबाबत जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त यांना कळविले. तसेच सिईओ डॉ ओम्बासे यांनी संचालक व.सहसंचालक यांच्याशी दुरध्वनीवर संपर्क करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल असे ठरले तसेच मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी २४ सप्टेंबर रोजी पञ पाठवून बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले आज २८ सप्टेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात आयटक आशा गटप्रवर्तक संघटना प्रतिनिधीची बैठक सकारात्मक झाल्यामुळे १५ दिवसांनी बहिष्कार स्थगीत करण्यात आला असे मत गटप्रवर्तक अध्यक्ष शबाना शेख आशा वर्कर अध्यक्ष ज्योषना राउत यांनी सांगितले*
आशा, गटप्रवर्तक यांनी बहिष्कार मागे घेतल्यामुळे *आरोग्य विभागा श्वास मोकळा केला*
*माझा कुटुंब -माझी जबाबदारी सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्याची हमी आरोग्य विभागास मिळाली*
माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण करताना पुर्ण साहित्य देण्यात यावे , बहुतांश आशा कडे अँन्डराईड मोबाईल नसल्यामुळे आँनलाईन माहिती भरण्यासाठी शक्ती करण्यात येवू नये. सर्वेक्षणाची माहिती गोळा करण्यासाठी गट प्रवर्तकांना सांगण्यात येवू नये ..यावेळी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रभाकर नाईक यांनी सर्वेक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य देण्यात येईल .या मोहिमेत गटप्रवर्तक यांना माहीती गोळा करण्यासाठी सांगण्यात येणार नाही . माहिती गोळा करण्यासाठी आरोग्य सहाय्यक यांना सांगितले आहे.असे सांगितले .तर आशानी सर्वे करतानी येणाऱ्या अडचणी सांगितलेल्या दूर करण्यात येईल
शासन निर्णयानुसार सिईओ साहेब यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे गटप्रवर्तक व आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचर यांना ग्रामपंचायतने १०००/- रुपये पोत्साहन भत्ता कुठे मिळाला नाही त्या ग्रामपंचायचे नाव सांगा त्याना विचारणा कराण्यात येईल .
*जिल्ह्यातील आशानी २९ सप्टेंबर पासून काम करावे अशा निर्णय झाला*
,वर्धा जिल्ह्यात १०३३ आशा वर्कर व ५४ गट प्रवर्तक आपल्या कुटुंबाची पर्वा नकरता कोरोणा योध्दा म्हणून काम करतात मागील ६ महिन्या पासून काम करताना. जनतेच्या शिव्याचा मार सहन करतात .जेव्हा आपल्या अडचणी अधिकाऱ्यांना सांगतात तेव्हा एकही अधिकारी मदत करीत नाही आता तर एकादा व्यक्तीची चाचणी पाँजेव्हीट निघाली तर दोषी आशांनाच धरुन अश्लील भाषेत बोलतात* अशा तक्रारी आशानी मांडल्या . *शासनाने ३१ मार्च रोजी परिपञक काढून कोवीड १९ मध्ये काम करणाऱ्या कार्यकत्यांना पोत्साहन भत्ता मानधना व्यतिरीक्त दरमहा १०००/- रुपये देण्यात यावे* असे सांगितले परंतु जिल्हा प्रशासनातील सुपीक डोक्यानी *त्या शासन निर्णयाचा अर्थ चुकीचा लावून एप्रिल ते आँगस्ट काम करुन सुध्दा फक्त १०००/- रुपये देण्यात आले तर गट प्रवर्तकांना अजून पर्यत देण्यात आले नाही*
*केंद्र सरकारने मंजूर केलेला पिआयपी मध्ये कोरोणा भत्ता म्हणून २०००/- रुपये देण्याची मंजूरी दिली असून त्यानुसार दरमहा दोन हजार रुपये देण्यात यावे*
*कोरोणा अंतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणासाठी प्रतिदिन ३००/- रुपये मोबदला देण्यात यावा. शासन निर्णय १७ जुलै २०२० नुसार आशा वर्कर २०००/- तर गट प्रवर्तक ३०००/- हजार मानधनवाढ त्वरीत देण्यात यावी. सर्व योजनाचा मोबदला दुप्पट करा* इत्यादी मागण्यावर चर्चा करण्यात आली
*जिल्हा प्रशासनाने १५ दिवसात योग्य न्याय न दिल्यास १३ आँक्टोबर पासून बेमुदत कामबंद करण्यात येईल* अशा इशारा संघटनेनी दिला.
बैठकीत प्रशासनाच्या वतिने प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रभाकर नाईक .जिल्हा आशा समन्वय दिपाली चांडोळे तर संघटनेच्या वातिने आयटक राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाणे शबाना शेख ज्योषणा राउत .प्रतिभा वाघमारे अरुणा खैरकार नंदा महाकाळकर प्रमिला वानखेडे ज्योषना मुंजेवार आमरपाली बुरबुरे प्रतिभा पाझारे यांची उपस्थिती होती.
Check Also
वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण
वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा
वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …