Breaking News

चंद्रपूर महानगरपालिकेत ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ कार्यशाळा

Advertisements

चंद्रपूर महानगरपालिकेत ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ कार्यशाळा
चंद्रपूर  – केंद्र सरकारच्या वतीने ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2020-2021’  हे अभियान 19 नोंव्हेंबर 2020 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानामधे देशातील 243 शहरांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका देखील सहभागी आहे. सरकारमार्फत सहभागी शहरांमध्ये माहितीप्रद कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार सफाई कामगार,डि स्लॅजिंग ऑपरेटर, एसटीपी येथील कर्मचारी यांची कार्यशाळा १५ व १६ मार्च रोजी चंद्रपूर महानगरपलिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली.
सिवेज लाईन्स, मॅनहोल आणि सेफ्टिक टँकची होणारी धोकादायक पध्दतीने माणसांकडून होणारी सफाई पूर्णपणे थांबवून त्याठिकाणी यांत्रिकी पध्दतीने स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्याचे मुख्य उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हे सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान राबविले जात असून याविषयी आधीपासूनच जागरूकतेने कार्यवाही करणारी चंद्रपूर महानगरपालिका विश्वासपूर्वक सहभागी झालेली आहे. स्वच्छ सर्वेक्षणात नेहमीच आघाडीवर राहिलेली चंद्रपूर  महानगरपालिका सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानामध्येही आघाडीवर राहील असा विश्वास मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार व आयुक्त श्री. राजेश मोहिते यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने यावर्षी सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान सुरू केले असून यामध्ये उत्तम कामगिरी करणार्‍या शहरांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे. त्यामुळे या बाबत आधीपासूनच सतर्कतेने कार्यवाही करणारी चंद्रपूर महानगरपालिका या अभियानातील मानांकनासाठी सज्ज झालेली आहे. सदर कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी मलवाहिन्यांच्या साफसफाईमध्ये हस्तक्षेप न करता ती यांत्रिकी मशीनव्दारे करण्याच्या दृष्टीने, मलवाहिनी व मशीन होल यांच्या साफसफाईसाठी सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या अद्ययावत यंत्रसामुग्री व उपकरणांची माहिती देण्यात आली. साफसफाई करताना  सफाई मित्रांसाठी हेल्मेट, हॅण्ड ग्लोव्हज, गमबूट, मास्क, युनिफॉर्म, फस्ट एड बॉक्स, गॅस मॉनिटर, ऑक्सिजन सिलेंडर, रिफेलेवटींग जॅकेट, टॉर्च अशा सुरक्षा साधन स्वरूपातील सेफ्टी किटची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले  तसेच मलनि:स्सारण विषयक काम करणार्‍या  सफाईकर्मींनी वर्षातून एकदा तरी आपली संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे सूचित करण्यात आले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

सुसनी साग के उपयोग से शिथिल नसों और शरीर की हड्डियों में चट्टान जैसी ताकत

सुसनी साग के उपयोग से शिथिल नसों और शरीर की हड्डियों में चट्टान जैसी ताकत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *