100 खाटांच्या रूग्णालयासाठी जोरगेवार यांचा आमदार विकास निधीतून मनपाला 1 कोटी निधी
चंद्रपूर-
कोरोना रुग्णांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी आमदार विकास निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी मनपा प्रशासनाला दिला. या निधीतून अत्याधुनिक कोविड रुग्णालय उभारण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना केल्या. मनपा प्रशासनाने आतापर्यंत कोविड रुग्णालय सुरु करणे अपेक्षीत होते. मात्र ते अद्याप सुरु झाले नाही. ही बाब लक्षात घेत शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगर पालिकेत बैठक घेत उपाययोजनांचा आढावा घेतला. महानगरात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आ. जोरगेवार यांच्या वतीने प्रशासनाला योग्य मार्गदर्शक सूचना केल्या जात आहेत. त्यांच्या निर्देशानंतर आयुर्वेदीक रुग्णालयही कोविडकरिता सुरु करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु करण्यात आले. तसेच नुकतीच त्यांनी रामनगर चौकातील शासकीय वैद्यकीय महाविदयालयाला भेट देत येथील 30 खाटा कोरोना रुग्णांसाठी सुरु केल्या आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार निधीतील 1 कोटी रुपये कोरोनावर खर्च करण्यासाठी परवाणगी दिली. त्यांनतर जोरगेवार यांनी हा निधी 100 खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी मनपाला हस्तांतरित केला. या निधीतून अत्याधुनिक कोविड रुग्णालय तयार करुन येथे प्राणवायू, व्हेंटीलेटर, अत्यावश्यक औषधी उपलब्ध करण्याच्या सूचना त्यांनी मनपा आयुक्तांना केल्या. आयुक्तांनीही यावर लवकर कार्यवाही करत मनपाच्या रैन बसेरा येथे हे रुग्णालय तात्काळ सुरु करण्याचे आश्वासन दिले.
Check Also
काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द
काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द टेकचंद्र सनोडिया …
जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम
जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …