Breaking News

 जिल्ह्यात कोरोनाचा रौद्ररूप,  23 जणांचा मृत्यू!,  1593 नवे बाधित

Advertisements

 जिल्ह्यात कोरोनाचा रौद्ररूप,  23 जणांचा मृत्यू!,  1593 नवे बाधित
चंद्रपूर-
जिल्ह्यात मागील 24 तासात 1593 बाधितांची नव्याने भर पडली असून, 23 जणांचा मृत्यू झाला आहे. ही स्थिती आजवरच्या कोरोनाकाळातील सर्वात भयाण आहे. जणू त्याचा रौद्ररूपच समोर आला आहे. एकीकडे आरोग्य सेवा वाढविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असले, तरी कडक संचारबंदी राबवून ही साखळी तोडण्याची गरज असताना रस्त्यावर पोलिसांचा धाक नाही. त्यामुळे नागरिक कारण नसताना गावात सैरभैर फिरताहेत. अनेक जण मुखाच्छादन वापरत नसल्याचे महानगराचे तसेच जिल्ह्याचे चिंताग्रस्त चित्र आहे!

Advertisements

तथापि, 549 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 40 हजार 647 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 30 हजार 103 आहे. सध्या 9969 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 24 हजार 945 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 2 लाख 77 हजार 424 नमुने नकारात्मक आले आहेत.
चोवीस तासा घडलेल्या मृत्यूसंख्येत वरोरा येथील 50 व 55 वर्षीय पुरुष व 72 वर्षीय महिला, एकार्जूना येथील 53 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील गोरवट येथील 54 वर्षीय पुरुष, चंद्रपूर येथील 70 वर्षीय पुरुष, सावली तालुक्यातील पथारी येथील 65 वर्षीय पुरुष, तळोधी येथील 66 वर्षीय पुरुष, चंद्रपुरातील सुनयना नगरातील 60 वर्षीय महिला, वरोड्यातील मालविय वार्डातील 74 वर्षीय महिला, चंद्रपूर येथील 60 व 68 वर्षीय पुरुष, गोंडपिंपरी येथील 38 व 61 वर्षीय पुरुष, चेक बोरगाव येथील 50 वर्षीय महिला, राजुरा येथील 58 वर्षीय पुरुष, नागभीड पंचायत समिती येथील 49 वर्षीय पुरुष, वडसा येथील 43 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील वडाला पायकू येथील 50 वर्षीय महिला, शेडगाव येथील 70 वर्षीय पुरुष, ब्रम्हपुरीतील गांधी नगर येथील 76 वर्षीय पुरुष, मेंडकी येथील 66 वर्षीय पुरुष व कुर्झा येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 575 बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 527, तेलंगणा 1, बुलडाणा 1, गडचिरोली 22, यवतमाळ 20, भंडारा 1, गोंदिया 1 आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. शनिवारी बाधित आलेल्या 1593 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 381, चंद्रपूर तालुका 81, बल्लारपूर 67, भद्रावती 72, ब्रम्हपुरी 181, नागभीड 112, सिंदेवाही 109, मूल 46, सावली 21, पोंभूर्णा 9, गोंडपिपरी 20, राजुरा 47, चिमूर 217, वरोरा 128, कोरपना 73, जिवती 12 व इतर ठिकाणच्या 17 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी मुखाच्छादनाचा वापर करावा, वारंवार हात धुवावे व सुरक्षित अंतर राखावे या त्रीसुत्रीचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने सातत्याने करीत असले, तरी त्याला जिल्ह्यात गांभीर्याने घेत आहे, असे प्राप्त परिस्थितीत दिसत नाही.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भाला अर्थसंकल्पात काय मिळाले?निव्वळ घोषणा?

महायुती सरकारच्या निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्पात विदर्भासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी १०० …

झाडावर उलटे टांगून माकडावर अत्याचार : कारवाईची मागणी

माकड हा मानवाचा पूर्वज असल्याचा दाखला दिला जातोय. तसेच अनेकदा माकडांच्या मर्कटलिलांना मनुष्यप्राणी वैतागतात. मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *