Breaking News

मित्रांना खर्रा खाणे अंगलट,खर्‍यातून सहा जण कोरोना बाधित!

Advertisements

मित्रांना खर्रा खाणे अंगलट,खर्‍यातून सहा जण कोरोना बाधित!
राजुरा-
तालुक्यातील वेकोलिच्या सास्ती-धोपटाळा वसाहती जवळील एका चबुतर्‍यावर सायंकाळी गप्पागोष्टी करीत खर्र्‍याचे सेवन करणार्‍या सहा मित्रांना कोरोनाची लागण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे कोरोना काळात काळजी न घेणार्‍या या मित्रांना खर्रा खाणे अंगलट आले आहे.

Advertisements

वेकोलिच्या सास्ती-धोपटाळा या कोळसा खाण कामगारांच्या वसाहतीजवळ आयटक व बीएमएम या कामगार संघटनांचे कार्यालय आहे. या समोरच रस्त्याचे बाजूला एक सिमेंटचा चबुतरा आहे. खाणीतील काम संपल्यावर सायंकाळी या चबुतर्‍यावर येऊन गप्पागोष्टी करीत काही लोक बसतात. हा या वसाहतीत राहणार्‍या सहा कामगार मित्रांचा छंद आहे. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यातही यात खंड पडत नाही. अर्थात, या चर्चेचे वेळी काहींना खर्रा व तंबाखू खाण्याचा छंद होता. या गोष्टी एकमेकांना आग्रह करून भरविण्यात त्यांना मित्रत्वाचा खरा अनुभव येत असावा.
पण नुकताच यापैकी एकाला ताप आला आणि त्याने कोरोना तपासणी केली असता, त्याचा अहवाल बाधित आला. त्यानंतर या सर्वच मित्रांनी कोरोना तपासणी करण्याचे याच चबुतर्‍यावर ठरविले. तपासणी नंतर सर्वच सहाही मित्र बाधित निघाले. यापैकी एकाला चंदपुरला खाट न मिळाल्याने त्याला अमरावतीला हलविण्यात आले. त्यानंतर परिवाराची कोरोना तपासणी करण्यात आली. यात काहींच्या पत्नी बाधित निघाल्या. कोरोना विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असताना केवळ दुर्लक्ष व निष्काळजीमुळे या लोकांसह त्यांच्या परिवाराला आता रूग्णालयात भरती होण्याची पाळी आली आहे. आता मात्र, कुणीही या चबुतर्‍यावर बसायला धजावत नाही.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष चर्चा

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष …

दिल्ली में आज नहीं हो पाएंगे मेयर चुनाव? AAP ने कहा- पुरानी परंपरा तोड़ना चाहते हैं उपराज्यपाल

दिल्ली में आज नहीं हो पाएंगे मेयर चुनाव? AAP ने कहा- पुरानी परंपरा तोड़ना चाहते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *