Breaking News

गत 24 तासात 993 कोरोनामुक्त, 973 पॉझिटिव्ह तर 22 मृत्यू

Advertisements

गत 24 तासात 993 कोरोनामुक्त, 973 पॉझिटिव्ह तर 22 मृत्यू
आतापर्यंत 46,125 जणांची कोरोनावर मात
ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,767
चंद्रपूर, दि. 3 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 993 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 973 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 63 हजार 868 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 46 हजार 125 झाली आहे. सध्या 16 हजार 767 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 87 हजार 23 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 18 हजार 795 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

Advertisements

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 52 वर्षीय महिला, बालाजी वार्ड येथील 58 वर्षीय पुरुष, एकोरी वार्ड येथील 55 वर्षीय महिला, भिवापुर वार्ड येथील 52 वर्षीय महिला, दुर्गापूर येथील 60 वर्षीय महिला, विठ्ठल मंदिर वार्ड येथील 60 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय पुरुष, तुकुम येथील 61 वर्षीय पुरुष, नगीना बाग येथील 51 वर्षीय महिला. ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान येथील 65 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील वाढोना येथील 35 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, मंगरूळ येथील 60 वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील 50 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील माजरी येथील 46 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील 72 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील केळझर येथील 70 वर्षीय पुरुष,
वणी-यवतमाळ येथील 57 वर्षीय पुरुष. भंडारा तालुक्यातील साकोली येथील 40 वर्षीय महिला. गडचिरोली येथील 76 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 976 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 904, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 29, यवतमाळ 28, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 973 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 390, चंद्रपूर तालुका 38, बल्लारपूर 81, भद्रावती 99, ब्रम्हपुरी 41, नागभिड 38, सिंदेवाही 25 , मूल 57, सावली 33, पोंभूर्णा 13, गोंडपिपरी 30, राजूरा 05, चिमूर 06, वरोरा 72, कोरपना 17, जिवती 10 व इतर ठिकाणच्या 18 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *