Breaking News

18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते स्थगित   45 वर्षावरील नागरिकांना मिळेल लस

18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते स्थगित

  45 वर्षावरील नागरिकांना मिळेल लस

चंद्रपूर दि.13 मे : राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार  दि. 14 मे 2021 पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांकरिता सुरू असलेले कोविड-19 लसीकरण पुढील आदेशापर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे तर  45 वर्षावरील नागरिक, हेल्थ केअर वर्कर व फ्रन्टलाईन वर्कर याचे लसीकरण नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविशिल्ड लसीचे एकूण 7 केंद्र व कोव्हॅक्सिन लसीचे एकूण 11 केंद्र 18 ते 44 या वयोगटाकरिता राखीव असून उद्यापासून आरोग्य विभागाच्या पुढील आदेशापर्यंत लसीकरण स्थगित करण्यात येत आहे. मात्र 45 वर्षावरील नागरिकांकरिता कोविड-19 लसीकरण केंद्रात लसीच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केंद्र सुरू राहतील. याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *