Breaking News

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ; महिला शिक्षक भारतीचे आयोजन

Advertisements
शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ; महिला शिक्षक भारतीचे आयोजन
मालेगाव :  येथील शिक्षक भारती संघटनेच्या महिला आघाडीतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संयोजक नुतन चौधरी यांनी दिली.
या स्पर्धेसाठी :कोरोनाची शिकवण..वाचवा पर्यावरण, वृक्षवल्ली आम्हां सोयरे”,ऑक्सिजनसाठी वृक्ष संवर्धन असे तीन विषय देण्यात आले आहेत.
निबंध स्वहस्ताक्षरात लिहिलेला अथवा वर्ड फॉरमॅट मध्ये असावा, बाराशे शब्द मर्यादा आहे.लिहिलेल्या निबंधाची PDF फाईल बनवून पाठवावी.फाईलवर स्वतःचे नाव लिहावे. स्वतंत्र पानावर आपले नाव ,शाळेचा पत्ता पूर्ण, ईमेल लिहावा,स्पर्धा निःशुल्क असून सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाइन ‘सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येतील.प्रथम पुरस्कार  रोख १५०१ रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,द्वितीय पुरस्कार – रोख १००१रूपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय पुरस्कार  – रोख ५०१रुपये,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तर दोन उत्तेजनार्थ रोख २५१ रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र याप्रमाणे असेल
निबंध २८मे पर्यंत shikshkbhartimahilamlg@gmail.com या ई मेलवर अथवा 86054 39846,
9403180880 ,86052 68788
या क्रमांकावर पाठवावे असे आवाहन मनिषा सावळे, सारिका अहिरे, विजया भदाणे, छाया देसले यांनी केले आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

दहा लाखाच्या संत्र्यावर शेतकऱ्याने फिरविला जेसीबी

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडले आहेत.उत्पादन खर्च अधिक व कमी नफा मिळत आहे. …

विश्व भर के मजदूरों और श्रमिकों को सम्मान देने के उद्देश्य से मनाया जाता है मजदूर दिवस

विश्व भर के मजदूरों और श्रमिकों को सम्मान देने के उद्देश्य से मनाया जाता है …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *