Breaking News

वर्धा पावरच्या कंपनीच्या तत्कालीन मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार., कंपनीनेआर्थिक फसवणूक केल्याचा आरोप.

Advertisements
वर्धा पावरच्या कंपनीच्या तत्कालीन मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार.
  कंपनीनेआर्थिक फसवणूक केल्याचा आरोप.
वरोरा  –
   येथील औद्योगिक वसाहत परिसरातील साई वर्धा पावर या विद्युत निर्मिती कंपनीला दिवाळखोरीत काढून ६ हजार२०७ कोटी रुपयांचा महाघोटाळा करणाऱ्या  तत्कालिन मालक किशोर सेथूरमन विरुद्ध  जय लहरी इंटरप्राइजेस कंपनीच्या संचालकाने पोलिसात तक्रार  दाखल केली आहे.आज मंगळवार दि.१८ मे रोजी दाखल केलेल्या या तक्रारीतून आर्थिक फसवणुकीचा आरोप करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याने कंप़़नी व्यवस्थापन मंडळात खळबळ उडाली आहे.
वरोरा औद्योगिक वसाहत परिसरात हैदराबाद येथील केएसके एनर्जी वेंचर्स यांच्या मालकीची साई वर्धा पावर विद्युत निर्मिती कम्पनी २०१०-११मध्ये सुरू झाली होती. या कंपनीच्या क्षमतेपेक्षा तिप्पट कर्ज  बँकाकडून दिले गेले. या कर्जासह कंपनीने १३३ कंत्राटदार आणि पूवठादारांचे १८४४.६९ कोटी रुपये आणि महावितरण व म्हाट्रान्सकोचे ६४१.६७ कोटी रुपये , वेकोलीचे ७५३.५३ कोटी रुपये तर इतर सरकारी कंपन्याचे १९८.३२ कोटी रुपये असे मिळून एकूण ६ हजार ८४८ कोटी ८५ लाख रुपये थकविले. आणि षडयंत्र रचून बँक अधिकारी, महावितरण आणि प्रवर्तक यांनी संगनमताने कंपनी दिवाळखोरीत काढली.परिणामी ६८४८.८५ कोटी थकबाकी तसेच १५२९.३० कोटी रूपयांचे बाजारमूल्य असलेली साई वर्धा पावर कंपनी केवळ ६४१ कोटी रुपयात जुन्या मालकाचा पीए तर नवीन कम्पनीचा सीईओअसलेल्या व्यक्तीच्या कंपनीला विकली गेली.या प्रक्रियेत ६२०७ कोटी रूपयांपेक्षा अधिकचा घोटाळा झाला असल्याचा आरोप आहे.
 यात खऱ्या अर्थाने १३३ कंत्राटदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अनेकांचे व्यवसाय बुडाले.काही कर्जबाजारीझाले. काही कंत्राटदार  आर्थिक डबघाईस आले आहे. यापैकी जय लहरी इंटरप्राइजेस या कंत्राटदार कम्पनीचे संचालक मुकेश जीवतोडे यांनी त्रस्त होऊन मंगळवार दि.१८मे रोजी कम्पनी चे तत्कालीन मालक किशोर सेथुरमन यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार देऊन आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप केला. तसेच गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. सदर कंत्राटदाराकडे कंपनीचा लेबर कॉट्रॅक्ट होता. याचे २०१७ पासूनची देयके कम्पनीने जाणीवपूर्वक थकीत ठेवली.आणि १०१९ मध्ये कंपनी दिवाळखोरीत काढून या कंत्राटदाराच्या ७२लाख४१हजार  ८२१ रूपयांच्या देयकासह इतर स्थानिक कंत्राटदारांची मिळून १९ करोड ३२ लाखांची देयके दिली नाही.सदर देयके दिवाळखोरी मध्ये निघण्याच्या दोन वर्षा पूर्वीची होती.ती वेळीच दिली गेली असती तर कंत्राटदाराला आर्थिक फटका बसला नसता.परंतु षडयंत्र रचून आणि  एनसीएलटी च्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कम्पनी दिवाळखोरीत काढण्याचे नियोजन केले व  कंत्राटदारांचे देयक बुद्धिपुरसर  थकविण्यात आले.यामुळे साई वर्धा पॉवर कंपनीच्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी झाल्यास मोठा घोटाळा बाहेर येऊ शकतो असे म्हटले जाते. दरम्यान मुकेश जीवतोडे या कंत्राटदाराने पोलिसात दिलेल्या तक्रारीवर पोलीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
वरोरा येथील साई वर्धा पावर दिवाळखोरीत काढून ६ हजार ६४८कोटी रुपये थकबाकी आणि पंधराशे तीस हजार कोटी रुपये बाजार मूल्य असलेली कंपनी केवळ ६४१ कोटीला विकून संबधीतांनी ६२०७ कोटी रुपयांचा महाघोटाळा केला आहे. या घोटाळ्याची तक्रार शिवसेना तालुकाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. सदर तक्रारीची तातडीने दखल घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्धा पावर च्या संपूर्ण व्यवहाराची आणि घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई तसेच स्थानिक कंत्राटदारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुकेश जीवतोडे यांना मुंबई येथील प्रत्यक्ष भेटीत दिले आहे. यामुळे कंत्राटदारामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक : पती-पत्नीचा जागीच मृत्यू

वर्धा येथून नागपूरकडे भरधाव येत असलेल्या कारने रस्त्यालगत उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. पती-पत्नीचा घटनास्थळीच …

उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार

उपचारासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर नवी मुंबईतील नालासोपारा येथील एका स्वयंघोषित वैद्याने बलात्कार केल्याची धक्कादायक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *