Breaking News

माजी मंत्री आम.सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मोफत आरटीपीसीआर चाचणी., वरोरा वासियानी मा.मुनगंटीवार चे मानले आभार.

Advertisements
माजी मंत्री आम.सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मोफत आरटीपीसीआर चाचणी.
वरोरा वासियानी मा.मुनगंटीवार चे मानले आभार.
वरोरा –
      वरोरा  तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून कोरोनाची लक्षणे असणारे अनेक नागरिक चाचणीसाठी येथील कोविड चाचणी केंद्रावर येत आहेत परंतु या केंद्रावर होणारी नागरिकांची गर्दी विचारात घेऊन राज्याचे माजी अर्थमंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून येथील नगर परिषदेच्या जुन्या इमारतीत  *मोफत आरटीपीसीआर चाचणी केंद्र* आज 18 मे मंगलवार पासून नागरीकांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहे.
आज या केंद्राचे उद्घाटन  वरोरा शहराचे  प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष अहेतेशामजी अली यांच्या हस्ते आज पार पडले. या कार्यक्रम प्रसंगी  प्रामुख्याने   नगरसेवक बाबा साहेब भागडे,डॉ भगवानजी गायकवाड़,तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश व महाजन उपस्थित होते.
    कोरोना आरटीपीसीआर चाचणी केल्यावर चाचणीचा अहवाल यायलाकमीतकमी चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो. या कालावधीत कोरोना ग्रस्त रुग्ण घरी न राहता रोजच्या कामात व्यस्त असतो अशा परिस्थितीत पाॅझिटीव्ह रुग्णापासून इतर लोकांना बाधा होउ शकते सोबतच चाचणी अहवाल उशिरा आल्याने त्या रूग्णांवर उपचार लवकर न झाल्याने  रुग्णाची प्रकृती गंभीर होत जाते. ही परिस्थिती लक्षात घेत माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदर चाचणी केंद्र नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात आले असून शहरातील रूग्णांना याचा फायदा होणार आहे .
    केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष अहेतेशामजी अली यांनी आमदार तथा माजी पालकमंत्री  सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेप्रती आभार  व्यक्त केले.
या कोविड चाचणी केंद्रावर सकाळी 11 ते दु 3 वाजे पर्यंत चाचण्या करण्यात येणार असून चाचणीचा अहवाल नागरिकांना दुसऱ्याच दिवशी  देण्यात येणार आहे. या केंद्रावर आज पासूनच चाचणीला सुरवात झाली  . नागरिकांनी  सर्दी. ताप, खोकला, अंग दुखणे ही कोरोनाची लक्षणे आढळल्यास किंवा तब्येतीत फरक जाणवल्यास लगेच आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आवाहन *स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या वतीने* करण्यात आले आहे
          केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी सुनीताबाई काकडे, दिलीप घोरपडे, अक्षय भिवदरे हे नगरसेवक सुनिल समर्थ, परशुराम मरस्कोल्हे, जगदीश तोटावार, राजेश साकुरे,महेश श्रीरंग, कादरभाई, बाबा काळमेघ ,आकाश भागडे, विनोद लोहकरे, अमित आशसेकर,श्रीकांत आत्राम, अभिजित गयनेवार, दादू खंगार ,प्रतीक काळे, राहूल बांदेकर, अजय वाटकर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते
Advertisements

About Vishwbharat

Check Also

उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पित असाल तर..!

शरीरातील पाण्याची पातळी राखणे हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तज्ज्ञ रोज १० ते १२ …

जानिए मनचाही संतान प्राप्ति के लिए नैसर्गिक नियमों का परिपालन और उपाय!

जानिए मनचाही संतान प्राप्ति के लिए नैसर्गिक नियमों का परिपालन और उपाय! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *