Breaking News

पालकमंत्र्यांच्या हस्ते अद्ययावत रुग्णवाहिकांचे लोकार्पण

Advertisements

पालकमंत्र्यांच्या हस्ते अद्ययावत रुग्णवाहिकांचे लोकार्पण

Advertisements

चंद्रपूर दि. 4 जून:- कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य सुविधा तत्परतेने उपलब्ध व्हाव्यात व रुग्णांना वेळेत इतर ठिकाणी हलविणे सोयीचे व्हावे, यासाठी शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता अद्ययावत अशा 7 रुग्णवाहिका आरोग्य विभागाला उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पूजन व हिरवी झेंडी दाखवून जिल्हा पोलिस ग्राऊंड येथे पार पडले.

Advertisements

कार्यक्रमाला खासदार बाळु धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत उपस्थित होते.

यापूर्वी जिल्हा खनिज विकास निधी मधून अद्ययावत अशा वीस मोठ्या रुग्णवाहिका पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या होत्या. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत पंधरा रुग्णवाहिका प्रस्तावित आहेत. या रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी हलविणे सोयीचे होणार आहे. या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळून त्यांचा जीव वाचवण्यास मदत होईल.

कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत यांनी केले. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *