Breaking News

प्रादेशिक

जिल्हा परिषदेसमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आंदोलन

 चंद्रपूर- खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खाजगी आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्यांची पूर्तता करावी, यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. मागण्यंचे निवेदन माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी पूनम मस्के यांना देण्यात आले. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी 1982 ची कुटूंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी, विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा, तुकड्यांना …

Read More »

बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाची सांगता,रामाळा तलाव रक्षणार्थ मागण्या केल्या प्रशासनाने मान्य

बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाची सांगता चंद्रपूर- शहरातील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी मागील 22 फेब्रुवारीपासून सुरु केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाची सांगता झाली. रामाळा तलावाच्या रक्षणार्थ इको- प्रोने केलेल्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे पत्र तहसिलदार निलेश गोंड यांच्या हस्ते देण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन धोतरे यांचे …

Read More »

गत 24 तासात 34 कोरोनामुक्त  ; 120 पॉझिटिव्ह

गत 24 तासात 34 कोरोनामुक्त  ; 120 पॉझिटिव्ह Ø  आतापर्यंत 23,128 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 588 चंद्रपूर, दि. 6 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 34 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 120 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 116 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची …

Read More »

शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाच्या हक्कांची पूर्तता करा- जिल्हाधिकारी  

चंद्रपूर, दि. 6 मार्च :  शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 1 ते 10 मार्च या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात 6 ते 14 वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण केले जाणार असून 100 टक्के बालकांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांच्या शिक्षणाच्या हक्कांची पूर्तता करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. जिल्ह्यातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या …

Read More »

गट समन्वयकांचा वाली तरी कोण ?

पोषण अभियानातील गट समन्वयकांना 6 महिन्यांपासून वेतन नाही ! () कोरपना ता.प्र.:-      महिला बालकल्याण पोषण अभियानामध्ये कार्यरत असलेल्या गटसमन्वयकांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याची बाब समोर आली असून याबाबत अजूनही कुठलीच माहिती देण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे.गेल्या २ वर्षांपासून बरेच युवकांनी सदर अभियानात मन लावून कामे केली आणि हे कार्य आताही सुरूच आहे.असे असताना यांना अजूनही …

Read More »

माणिकगड कंपनीने आदिवासींचा छळ थांबवावा,अंत पाहू नये.

माणिकगड कंपनीने आदिवासींचा छळ थांबवावा,अंत पाहू नये. कोरपना(ता.प्र):-      गडचांदूर शहरात स्थित माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासनाने कुसुंबी येथील आदिवासी, कोलाम कुटुंबा विरूद्ध मनमानी धोरण अवलंबुन सातत्याने अन्याय,अत्याचार करून वेठीस धरले आहे.अन्याय असह्य होत असून याविरोधात कमालीची चिड निर्माण होत आहे. आतातरी या गोरगरीब आदिवासी, कोलामांचा छळ थांबवावा,अंत पाहु नका,अशी संतप्त भावना व्यक्त होत असून बळजबरीने शेती नष्ट करून चुनखडीचे उत्खनन …

Read More »

कुलरचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे….

चंद्रपूर- उन्हाचा कडाका वाढल्याने स्टोअर रूममधून कुलर बाहेर काढण्यात आले आहे. उकाडयामुळे घरोघरी कुलरचा वापर वाढला असून कुलर काळजीपूर्वक वापरून विजेचे अपघात टाळणे आहे. प्राधान्याने मुलांना कुलरपासून दूर ठेऊन सकर्तता बाळगणे हितावह ठरणारे आहे. उन्हाळयात षाॅक लागून जीवहानी अथवा आग लागल्याने वित्तहानी संभवते. अपघात टाळण्यासाठी कुलरचा वापर नेहमी थ्री-पीन प्लगवरच करावा. घरात अर्थिंग लिकेज सर्किट बेस बसवून घ्यावे, बाजारात हे उपकरण सहज …

Read More »

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

एनआयएकडे तपास द्या सभागृहात भाजपची जोरदार मागणी सचिन वाझे संशयाच्या भोव-यात दोन्ही गाड्या ठाण्यातील एटीएसकडे सोपवला तपास मुंबई (प्रतिनिधी) : रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील एंटीलियाबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पियो गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. या प्रकरणावर आक्रमक झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात यावा, अशी …

Read More »

वरोरा नगर परिषदेचा  108, 22, 42, 136 /- अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजूर. 

 वरोरा:-              वरोरा नगर परिषदेतील सण 2021-22 यावर्षीचे अंदाज पत्रक नगराध्यक्ष अहंतेश्याम अली यांनी दिनांक 23- 2- 2021 ला झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर केले व ते सर्वानुमते अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. शहरातील सर्वांगिन विकास साधण्याकरिता तसेच आरोग्य व मूलभूत सोयी नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबत नगरपरिषदेची 2021-22 मध्ये प्राथमिक शिल्लक धरूण  अंदाजित जमा रक्कम रुपये 108 …

Read More »

वंचित बहुजन आघाडी चे वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

वंचित बहुजन आघाडी चे वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन प्रमुख मागणी -केंद्र सरकारने शेती संदर्भात पारित केलेले 3 काळे कायदे रद्द करावे. वरोरा-केंद्र सरकारने शेती संदर्भात पारित केलेले तीन कायदे रद्द करावे, यासाठी वंचित बहुजन आघाडी ,वरोरा तालुक्याचे वतीने , 5 फरवरीला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.मागण्यांचे निवेदन शिष्टमंडलानी तहसीलदार बेडसें  यांना दिले.     मागील वर्षभरात …

Read More »